

Mumbai 100th Marathon
sakal
पुणे : उद्योजक असल्यामुळे दर महिन्याला १५-२० दिवस देशात, परदेशात भ्रमंती असली तरी, धावण्याच्या व्यायाम प्रकारात कधी खंड पडला नाही. आपण कायमच तंदुरुस्त असले पाहिजे, हा विचार मनात असल्यामुळे पहाट झाली की, पावले आपसूकच धावायला लागतात आणि त्यामुळेच ४२ किलोमीटर अंतराची १०० वी मॅरेथॉन मुंबईत पूर्ण करण्यात यश आले.... सांगत होते, मॅरेथॉनपटू आणि टी-१० स्पोर्टस कंपनीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विनीत अग्रवाल.