esakal | उद्योजक गौतम पाषाणकरांसह त्यांच्या मुलीचा अटकपूर्व जामीन फेटाळला I Pune
sakal

बोलून बातमी शोधा

Gautam Pashankar

उद्योजक गौतम पाषाणकरांसह त्यांच्या मुलीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - सदनिका खरेदीसाठी पूर्ण पैसे भरूनही ग्राहकास ताबा व कागदपत्र न देता दोन कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक तसेच त्याला मारहाण केल्याप्रकरणात उद्योजक गौतम पाषाणकर आणि त्यांची मुलगी रीनल पाषाणकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. सत्र न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर यांनी हा आदेश दिला.

या प्रकरणी गौतम पाषाणकर, रीनल पाषाणकर आणि दिप विजय पुरोहित (रा. कल्याणीनगर) यांच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेंद्र पंडितराव पाटील (वय ४२, रा. पंचवटी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पाटील यांनी प्रोक्झिमा क्रिएशन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन खराडी येथील बांधकाम प्रकल्पातील सी इमारतीमध्ये दोन सदनिका खरेदी करण्याचे निश्चित केले होते. त्यांच्यात ठरल्याप्रमाणे दोन कोटी ८७ लाख रुपयांचा करारनामा ही झाला होता. या व्यवहारापोटी आरोपींनी पाटील यांच्याकडून तीन कोटी ४० लाख रुपये घेण्यात आले. पैसे घेऊनही त्यांना सदनिकेचा ताबा दिला नाही, तसेच त्याचे नोंदणीकृत दस्तही केले नाहीत.

हेही वाचा: पथारी व्यवसायिकांचे हडपसर उड्डाणपूलाखाली तात्पुरते पुनर्वसन

याउलट संबंधित सदनिका दुस-याला विकण्यात आल्या. याचा फिर्यादी यांनी जाब विचारला, तेव्हा फिर्यादीस पाषाणकर यांच्या जंगली महाराज रस्ता येथील कार्यालयात बोलविण्यात आले. तेथे त्यांना पाषाणकर व त्यांच्या नोकरांनी पाटील यांना जबर मारहाण केली, अशी फिर्याद देण्यात आली आहे. दरम्यान व्यावसायात आलेल्या नुकसानीमुळे नैराश्यातून गौतम पाषाणकर हे बेपत्ता झाले होते. फसवणूक व मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गौतम पाषाणकर आणि रीनल पाषाणकर यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यास सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी विरोध केला.

तर समाजात वेगळा संदेश जाईल

या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोपींकडे त्याचा तपास करायचा आहे. आरोपींनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. त्यांना जामीन मंजूर झाल्यास समाजात वेगळा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे त्यांचा जामीन फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. कावेडिया यांनी केला.

loading image
go to top