स्तुत्य उपक्रम : बारामतीतील उद्योजक लावणार एक हजार झाडे !

मिलिंद संगई
Tuesday, 30 June 2020

येथील एमआयडीसी हरित होण्याच्या दृष्टीने आता बारामतीतील उद्योजकांनीच पुढाकार घेतला आहे. येत्या 15 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान बारामती एमआयडीसीत विविध ठिकाणी एक हजार झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी दिली.

बारामती : येथील एमआयडीसी हरित होण्याच्या दृष्टीने आता बारामतीतील उद्योजकांनीच पुढाकार घेतला आहे. येत्या 15 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान बारामती एमआयडीसीत विविध ठिकाणी एक हजार झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 61 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून हरित एमआयडीसी सुंदर एमायडिसी अभियान राबविले जाणार आहे. या उपक्रमात वनविभागाचीही मदत घेतली जाणार आहे. आज (ता. ३०) या संदर्भात झालेल्या बैठकीस वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांच्यासह धनंजय जामदार, उपाध्यक्ष शरद सूर्यवंशी, सचिव अनंत अवचट, खजिनदार राधेशाम सोनार, सदस्य मनोज पोतेकर, संभाजी माने, महादेव गायकवाड, मनोहर गावडे, शेख वकील आदी उपस्थित होते.
-------------
खूशखबर ! भारतीय बनावटीची पहिली करोना लस तयार
-------------
एमआयडीसीतील उद्योजक व कंपन्यांना त्यांच्या भूखंडावर आतील व बाहेरील बाजूस स्थानिक प्रजातीच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यासाठी प्रोत्साहन व आवश्यकतेनुसार रोपेही दिली जाणार आहेत. या वृक्षांचे संगोपन संबंधित कंपन्यांकडून केले जाणार आहे. केवळ झाडे लावण्यापेक्षाही त्यांचे संगोपन कसे होईल याची दक्षता घेतली जाणार आहे. लागवडीपासून वृक्षसंवर्धनापर्यंत उद्योजकांना परिपूर्ण मार्गदर्शनही यात होईल. वृक्ष लागवडीसाठी स्थानिक प्रजातींची रोपे विनामूल्य उपलब्ध करून फळे व शोभिवंत झाडे यांची रोपे किमान दरात उपलब्ध करून दिली जातील तसेच शास्त्रोक्त लागवडीसाठी संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल अशी ग्वाही बारामती वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी दिली.

हरित एमआयडीसी सुंदर एमआयडीसी या अभियानाचा प्रारंभ बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लवकरच करणार असून बारामती, पणदरे व बारामती सहकारी औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांनी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Entrepreneurs in Baramati will plant one thousand trees