

Thick foam seen floating on the polluted waters of the Mula River in Pune.
sakal
पिंपळे गुरव: पिंपळे निलख चोंधे लॉन्स येथील मुळा नदीपात्रात विशालनगर ते बालेवाडीला जोडणाऱ्या बंधाऱ्याजवळील विसर्जन घाट परिसरात कोणतीही प्रक्रिया न करता थेट मैलामिश्रित पाणी सोडले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे पाण्याच्या पृष्ठभागावर पांढऱ्या फेसाचे थर दिसत असून, काही ठिकाणी काळसर रंगाचा मैलामिश्रित गाळ साचलेला आढळून येत आहे.