
पुणे : सुमारे दीड हजार प्रेक्षकांची आसनक्षमता... ७० बाय ५० फूट आणि ६० बाय २५ फूट आकारांचे दोन रंगमंच... रंगमंचावर कलाकारांच्या पाठीशी जणू काही नटराजासारखा उभा असणारा वटवृक्ष आणि प्रवेशद्वारावर असलेली सरस्वतीची मूर्ती...असे देखणे आणि सुसज्ज ॲम्फी थिएटर भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत तयार झाले आहे. या थिएटरचे उद्घाटन गुरुवारी केंद्रीय स्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.
या ॲम्फी थिएटरचे नामकरण ‘समवसरण’ असे करण्यात आले आहे. ‘सम’ म्हणजे समान आणि ‘अवसर’ म्हणजे संधी, त्यामुळे ‘समान संधी देणारे’ असे समर्पक नाव या थिएटरला देण्यात आले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात रसिकांना कलेचा आस्वाद घेण्यासाठी एक हक्काचे ठिकाण यांमुळे तयार झाले आहे. विशेष म्हणजे, परिसरातील वडाच्या झाडाला धक्का न लावता त्याभोवती रंगमंच तयार करण्यात आला आहे.
तसेच परिसरातील इतर झाडांनाही धक्का न लावल्याने रंगमंचासह संपूर्ण परिसराला या झाडांच्या सावल्यांचा लाभ मिळत आहे. तसेच, या खुल्या नाट्यगृहामुळे पारंपारिक नाट्यगृहांपेक्षा वेगळी ‘परफॉर्मन्स स्पेस’ देणारे नाट्यगृह कलाकार व रसिकांना उपलब्ध झाले आहे. या नाट्यगृहात दोन प्रमुख रंगमंचासह कार्यशाळा, वर्ग आदी भरवण्यासाठी काही भाग, शास्त्रीय संगीत सादर करण्यासाठी विशिष्ट रचना यांचीही निर्मिती करण्यात आले आहे.
‘समवसरण’ची वैशिष्ट्ये :
वडाच्या झाडाभोवती तयार केलेला रंगमंच
७० बाय ५० फूट आणि ६० बाय २५ फूट आकारांचे दोन रंगमंच
दोन्ही रंगमंचांची अनुक्रमे ७०० व ३०० प्रेक्षकांची आसनक्षमता
सहा विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रवेशद्वार
कार्यशाळा, वर्ग आदींसाठी स्वतंत्र जागा
शास्त्रीय संगीताच्या सादरीकरणासाठी स्वतंत्र जागा
भारतीय कला व साहित्यावर आधारित रेखाटलेली भित्तीचित्रे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.