Pneumonia Patient : तापमानाच्‍या तीव्र बदलाचा फटका; हवामानाच्या बदलाने पुण्यात न्यूमोनियाचे वाढते रुग्ण

तापमानात अचानक होणारे बदल, थंड व कोरडी हवा आणि वाढलेली प्रदूषणाची पातळी यामुळे फ्लू-सदृश आजारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
Pneumonia

Pneumonia

Sakal
Updated on

पुणे - गेल्या पंधरा दिवसांपासून हवामानात तीव्र बदल होत आहेत. दिवसभर गरम, तर रात्री थंडी वाढते. तसेच, शहर व परिसरात ढगाळ वातावरण राहत असून त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्‍यामुळे सर्दी, खोकला तसेच श्वसनसंस्थेशी संबंधित आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. विशेषतः न्यूमोनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com