भोसरीतील कंपनीला आग

संदिप घिसे 
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

पिंपरी : भोसरी एमआयडीसीतील हायटेक मेटल प्रोसेसर या कंपनीला शुक्रवारी पहाटे आग लागली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही.

अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसीतील टी ब्लॉकमध्ये असलेल्या हायटेक मेटल प्रोसेसर या कंपनीला आग लागल्याची वर्दी शुक्रवारी पहाटे ३.४५ वाजता मिळाली. त्यानुसार भोसरी अग्निशामक केंद्र आणि अग्निशामक मुख्यालयातून प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र आगीचे स्वरूप पाहता आणखी एक बंब घटनास्थळी पाचारण केला. सुमारे ५.३० वाजता आग आटोक्यात आली. या आगीत सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. आगीचे कारण समजू शकले नाही.

Web Title: esakal marathi news bhosari midc fire news