
पुणे : सकाळ माध्यम समूहाच्या डिजिटल पत्रकारितेतील महत्त्वाचा टप्पा गाठणाऱ्या ‘ई-सकाळ’ने २५ वर्षे पूर्ण केली आहेत. हा रौप्य महोत्सव साजरा करत असतानाच ‘ई-सकाळ’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. ‘कॉमस्कोअर’च्या जानेवारी २०२५ अहवालानुसार ‘ई-सकाळ’ हे भारतातील सर्वाधिक वाचले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल ठरले आहे.