पुण्यात क्यूब केंद्राची स्थापना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

केंद्राचे स्वरूप

  • नैसर्गिक व मानवनिर्मित स्थापत्य सर्वेक्षणपद्धती 
  • कृषी व वृक्षगणना आणि वृक्ष नकाशा तयार करणे
  • ड्रोनविषयक कायदे व परवानग्यांसंबंधी मार्गदर्शन
  • सौरऊर्जा, कृषी क्षेत्रावर उंचावरून देखरेख, सौरऊर्जा पॅनेल लावण्यासाठी सर्व्हेक्षण
  • बांधकामांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट, पायाभूत सुविधांचा अभ्यास शक्‍य

पुणे - ड्रोनचा वापर कसा करावा, त्यातून कृषी सर्वेक्षण, नकाशे, वृक्षगणना स्ट्रक्‍चरल ऑडिट, या कामांचे प्रशिक्षण देण्यासाठी ‘सेंटर फॉर यूएव्ही इन बिल्ट एनव्हायर्न्मेंट’ (क्‍यूब) या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर फॉर विमेन (बीएनसीए) संस्थेत केंद्र सुरू झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मदतीने ‘बीएनसीए’ आणि ‘रिडिट टेक्‍नॉलॉजी’तर्फे नैसर्गिक व मानवनिर्मित स्थापत्य क्षेत्राच्या अभ्यासात ‘मानवरहित ड्रोनचा उपयोग’ यावरील परिषदेचे उद्‌घाटन ‘इस्रो’चे माजी संचालक डॉ. सुरेश नाईक यांच्या हस्ते झाले. डॉ. सुजाता कर्वे, प्रा. नम्रता धामणकर, प्रा. निधी दीक्षित, प्रा. प्राजक्ता कुलकर्णी आणि लीना दत्तगुप्ता, प्राचार्य डॉ. अनुराग कश्‍यप, रणबीरसिंग डागर उपस्थित होते.  

अतिवृष्टीमुळे किंवा नैसर्गिक संकटामुळे शेतीचे नुकसान होते. त्याचे सर्वेक्षण ड्रोनने करता येते. वेळ आणि शक्तीचीही बचत होईल. शेतकऱ्यांना कमी वेळेत आर्थिक मदत मिळवून देता येईल, असा विश्वास डॉ. नाईक यांनी व्यक्त केला. ड्रोनच्या उड्डाणाचे नियम निश्‍चित झालेले नाहीत. ते समाजहिताच्या व सुरक्षेच्या दृष्टीनेही अंतिम स्वरूपात राबवणे आवश्‍यक आहे, असे डागर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Establishment of Cube Center in Pune