नारायणगाव : किल्ले संवर्धनासाठी फोर्ट फेडरेशनची स्थापना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fort federation
नारायणगाव : किल्ले संवर्धनासाठी फोर्ट फेडरेशनची स्थापना

नारायणगाव : किल्ले संवर्धनासाठी फोर्ट फेडरेशनची स्थापना

नारायणगाव : तीनशे पेक्षा जास्त असलेले किल्ले (fort)(छत्रपती शिवाजी महाराजांची जिवंत स्मारके आहेत.किल्ले संवर्धन करून जतन करण्यासाठी फोर्ट फेडरेशनची (fort federation) स्थापना केली आहे. या माध्यमातून निवडक पन्नास किल्ले शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामात राज्यातील सर्व शिवभक्त संघटनांना सहभागी करून घेणार आहे.अशी माहीती खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी दिली.

हेही वाचा: पुणे : सराईत गुन्हेगाराकडून घरफोडीच्या तब्बल 30 घटना उघड

लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, जनसेवा मित्र मंडळ यांच्या पुढाकारातुन ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून सुमारे पन्नास लाख रुपये खर्च करून येथील शिवकालीन पुर्व वेस प्रवेशद्वाराचा जीर्णोद्धार केला आहे. प्रवेशद्वाराचे राजा शिवछत्रपती महाद्वार असे नामांकरण करण्यात आले आहे.या निमित्ताने ग्रामस्थांच्या वतीने ३ जानेवारी ते पाच जानेवारी दरम्यान तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुर्व वेशीवर सुमारे बारा फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला आहे.बुधवारी(ता.५) सायंकाळी राजा शिवछत्रपती महाद्वाराचे लोकार्पण खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सरपंच पाटे यांच्या हस्ते खासदार संभाजी राजे छत्रपती यांना वक्र भवानी तलवार भेट देण्यात आली.

हेही वाचा: पुणे : साथीच्या काळात हवी सकारात्मक दिनचर्या

या निमित्त आकर्षक शोभेचे दारुकाम व विद्युत रोषणाई करण्यात आली होती.या दिमाखदार सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी सहयाद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे, सुरगाणा संस्थांचे अतिषराजे पवार, आमदार महेश लांडगे, अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकरअक्षय आढळराव पाटिल, माजी सभापती शिवाजीराव खैरे, आशा बुचके,संतोष खैरे, सरपंच राजेंद्र मेहेर आदि मान्यवर उपस्थित होते.खासदार संभाजी राजे छत्रपती म्हणाले स्वराज्य सुराज्य व्हावे हे छत्रपती शिवाजी महाराजाचे स्वप्न होते. अठरा पगड जातींना बरोबर घेऊन जाण्याचे त्यांचे संस्कार व विचार पुढे घेऊन जाण्यासाठी महाराजांचे किल्ले जतन करून जिवंत करणे आवश्यक आहे.या साठी राजकारण बाजूला ठेवणे आवश्यक आहे.फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून सर्व राजकीय व्यक्ती , शिवभक्त संघटना यांना घेऊन पन्नास किल्ल्याचे शास्त्रोक्त पद्धतीने जतन करण्याचा मी निर्णय घेतला आहे.या साठी काही उद्योजक यांच्याशी चर्चा झाली आहे.छत्रपती शिवाजी महाराजाचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्याला जगात महत्वाचे स्थान आहे. शिवनेरी किल्याला संरक्षण देणारे तालुक्यातील इतर किल्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे.यापैकी दोन किल्यांचे संवर्धन फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून केले जाईल.

हेही वाचा: सोलापूर : कोरोनात पोटभर अन्नासाठी सर्वसामान्यांचा संघर्ष!

संभाजी राजे छत्रपती (खासदार) : शासनाच्या आर्थिक मदती शिवाय सरपंच पाटे यांनी लोकवर्गणीतून पन्नास लाख रुपये खर्च करून शिवकालीन प्रवेशद्वाराचा जीर्णोद्धार केला आहे.किल्यांचे संवर्धनाच्या कामात या मावळ्यांना सहभागी करून घेतले जाईल.मात्र या कामात व्यासपीठावर उपस्थित असलेले आजी,माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य व उपस्थित मान्यवर या पैकी एकानेही आर्थिक मदत केली नाही. सरपंच पाटे म्हणाले माझ्यावर ग्रामस्थांनी विश्वास टाकल्याने ग्रामस्थ व तरुण सहकाऱ्यांच्या मदतीमुळे हे काम करणे शक्य झाले.लोकसहभागातून केलेल्या या कामाची ऐतिहासिक नोंद होईल.असे मत या वेळी आमदार लांडगे, बेनके यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर औटी, मेहबुब काझी यांनी केले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewsFortFort News
loading image
go to top