Pune News : युरोपियन हायपरलूप वीकमध्ये एमआयटीच्या टीम वेगापॉडचा इंग्लंडमध्ये डंका

युरोपियन हायपरलूप वीक २०२३ मध्ये पुण्यातील विद्यार्थ्यांचा डंका वाजला आहे. त्यांनी तयार केलेल्या हायपरलूप पॉडने जगातील सर्वोत्कृष्ट सहा संघामध्ये स्थान पटकावले आहे.
MIT Team Vegapod
MIT Team Vegapodsakal

पुणे - युरोपियन हायपरलूप वीक २०२३ मध्ये पुण्यातील विद्यार्थ्यांचा डंका वाजला आहे. त्यांनी तयार केलेल्या हायपरलूप पॉडने जगातील सर्वोत्कृष्ट सहा संघामध्ये स्थान पटकावले आहे. ब्रिटनच्या एडिनबर्ग विद्यापीठात नुकतेच हे आयोजन करण्यात आले होते.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांची टीम वेगापॉडने भारताचे तर प्रतिनिधित्व तर केले. पण आशियातील एकमेव प्रतिनिधी म्हणून ते तिथे उपस्थित होते. यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्कूलचे प्रमुख प्रा.डॉ.गणेश काकंडीकर यांच्या नेतृत्व आणि प्रा.डॉ.ओमकार कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनाची पार्श्वभूमी असलेल्या २५ हून अधिक विद्यार्थ्यांच्या संघात समावेश आहे.

संघाचे नेतृत्व पूर्णेश जैन याने केले कर मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून चैतन्य सहस्रबुद्धे आणि व्यवसाय व्यवस्थापक म्हणून शुभम गांधी यांनी काम पाहिले. सुमारे आठवडाभर चाललेल्या या स्पर्धेत टीम वेगापॉडने विकसित केलेल्या हायपरलूप पॉडने उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच त्यांनी इतर संघांच्या तुलनेत कमी खर्चात पूर्ण कार्यक्षम प्रोटोटाइप विकसित केला.

आपल्या दौऱ्यात विद्यार्थ्यांना एडिनबर्ग येथील भारतीय दूतावासातील वरिष्ठ अधिकारी बिजय सेल्वाराज आणि लंडनमधील भारतीय उपउच्चायुक्त सुजित घोष यांना भेट मिळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com