esakal | ''तब्बल साठ वर्षानंतरही घरांना मालकी हक्क नाही''
sakal

बोलून बातमी शोधा

''तब्बल साठ वर्षानंतरही घरांना मालकी हक्क नाही''

''तब्बल साठ वर्षानंतरही घरांना मालकी हक्क नाही''

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पानशेत धरण फुटीला उद्या (सोमवारी) साठ वर्ष पूर्ण होत आहेत. अद्यापही आंबिल ओढा कॉलनीतील पूरग्रस्तांना घरे मालकी हक्काने करून देण्यात आलेली नाही. आता तरी पुणे महापालिकेने त्यांना मालकी हक्काने घरे करून द्यावीत, अशी मागणी या वसाहतीतील नागरीकांनी केली आहे.

१२ जुलै १९६१मध्ये पानशेत धरण फुटले. या धरणफुटीमुळे साडेसातशेहून अधिक घरे उद्‍ध्वस्त झाली. तर २६ हजार कुटुंबांच्या मालमत्तेची हानी झाली, दहा हजार कुटुंबे विस्थापित झाली. त्यापैकी १२० कुटुंबांचे पानशेत पूरग्रस्त म्हणून आंबिल ओढा कॉलनी येथे पुनर्वसन करण्यात आले. त्यास साठ वर्ष झाले. अद्याप मालकी हक्क मिळालेला नाही, असे श्‍याम ढावरे यांनी सांगितले.

हेही वाचा: मोबाईल, टीव्हीमुळे विकाराला निमंत्रण! लहान मुलांकडून अतिरेकी वापर

दत्तवाडी, सेनादत्त पेठ, राजेंद्र नगर,पर्वती दर्शन, शिवदर्शन असे शहराच्या अन्य भागात पूरग्रस्त म्हणून पुनर्वसन करण्यात आलेल्या सुमारे ३ हजार ९९८ पैकी काही गाळेधारकांना सरकारकडून मालकी हक्क करून देण्यात आला. मात्र, अद्यापही आंबिल ओढा कॉलनीतील रहिवाशांना मात्र मालकी हक्क मिळालेला नाही. या मागणीसाठी वारंवार मोर्चा काढून निवेदने देऊनही महापालिकेकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तातडीने रहिवाशांची ही मागणी मान्य करावी, असे ढावरे यांनी म्हटले आहे.

loading image