esakal | मोबाईल, टीव्हीमुळे विकाराला निमंत्रण! लहान मुलांकडून अतिरेकी वापर
sakal

बोलून बातमी शोधा

मोबाईल, टीव्हीमुळे विकाराला निमंत्रण! लहान मुलांकडून अतिरेकी वापर

मोबाईल, टीव्हीमुळे विकाराला निमंत्रण! लहान मुलांकडून अतिरेकी वापर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

पुणे : टॅब, मोबाईल, टिव्ही आदी गॅझेट वापरण्याचा लहान मुलांकडून अतिरेक होत असल्यामुळे त्यातून निघणाऱ्या रेडिओ लहरींमुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक आजारांना सामोरे जावे लागत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार आंतरराष्ट्रीय रोग वर्गीकरणाच्या यादीत व्हिडिओ गेमला व्यसन मानले गेले आहे. त्याचप्रमाणे हा एक मानसिक आजार आता समजला जाऊ लागला आहे.

डिजिटल युगात संगणक, मोबाईल आणि टॅब अशा विविध उपकरणांचा वापर होत आहे. त्यामधे लहान मुले-मुली तासन्तास युट्यूबवरील व्हिडिओ आणि टिव्ही वरील कार्टून पाहतात. तसेच ४-५ तास गेम खेळण्याचेही अनेक मुलांना व्यसन जडले आहे. त्यातून मेंदूवरील नियंत्रण कमी होऊन मानसिक आणि शारीरिक आजार होऊ शकतो.

हेही वाचा: आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडी?

''सुरुवातीला कुटुंबासहित अर्धा ते एक तास टीव्ही पाहायचो. मात्र, मुलाचा टीव्ही पाहण्याचा कालावधी दिवसेंदिवस वाढतच गेला. दररोज तीन ते चार तास कार्टून्स, विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहणे याची सवय पडली. त्यामुळे झोप न लागणे, डोळ्यांची जळजळ अशा तक्रारी सांगितल्या. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागला.''

- अनुपमा सातभाई, पालक

''मुलीला जेवताना टीव्हीवरील कार्टून्स लावायचो. कधी रडली तर मोबाईलवर युट्यूब चालू करून विविध व्हिडिओ दाखवायचो. तसेच हे नियमित होत गेले आणि त्यामुळे पाहण्याच्या वेळात वाढ झाली. कालांतराने वेळेत जेवण न केल्याने पोट दुखणे, डोळ्यातून पाणी येणे असे विविध विकार दिसू लागले.''

- अमोल कांबळे, पालक

''बाळाला जेवताना, रडताना टिव्ही किंवा मोबाईल दाखविल्याने त्याच्या मेंदूत डोपामाइन हे आनंद देणारे रसायन स्त्रवते. त्यामुळे बालकांना पाहणे हवेहवेसे वाटते. याला पर्याय म्हणून पालकांनी विविध खेळणी, चित्र काढणे,गोष्टी वाचून दाखविणे आणि त्यांचा छंद जोपसणे यांचा उपयोग करावा. परिणामी डोळ्यांची जळजळ डोळ्यांचे विकार टाळले जाऊ शकतात.''

- डॉ. श्रुती जाधव, बालरोग तज्ञ, खराडी

हेही वाचा: चिखलीत थरार! भरदिवसा तरुणाचा निर्घृण खून

का होतं असे?

 • लहान मुलांसाठी टीव्हीवरील मनोरंजनासाठी उपलब्ध असलेले विविध कार्यक्रम

 • बालकांना जेवण भरताना टिव्ही किंवा मोबाईल दाखविणे

 • यूट्यूबवरील आकर्षक व नावीन्यता असलेले व्हिडिओ

 • आई-वडिलांव्यतिरिक्त इतर सांभाळ करायला नसल्यास टिव्ही लावणे किंवा मोबाईल देणे

 • पालकांचा नियमित सुसंवादाचा अभाव

डोळ्यांचा त्रास

 • सतत एका ठिकाणी बसल्याने लठ्ठपणा

 • पुरेशी बौद्धिक क्षमता विकसित न होणे.

 • दिनचर्येत बदल उदा. झोपायाच्या वेळेत बदल, जेवणाच्या वेळेत बदल.

 • अभ्यासात पुरेसे लक्ष न लागणे.

हेही वाचा: फायनान्स कंपन्यांच्या ‘गुंडां’चा जाच

उपाय

 • मोबाईल किंवा टिव्ही पाहण्यासाठी ठराविक वेळेची गरज.

 • जेवताना टिव्ही न बघणे.

 • झोपायच्या अगोदर एक ते दोन तास टिव्ही किंवा मोबाईलचा वापर टाळणे.

 • पालकांनी मुलांसोबत सुसंवाद साधण्याची गरज.

 • पालकांनीही मुलांसोबत अनुकरण करण्याची गरज.

 • स्क्रीनव्यतिरिक्त इतर ठिकाणी बालकांना गुंतवणे उदा. खेळणी, घरातील वस्तु, आदी..

जागतिक आरोग्य संघटनेनुसार बालकांना स्क्रिनकडे पाहण्याचा वेळ ठरविण्यात आला आहे, तो खालीलप्रमाणे

 • ०-१२ महिन्यातील बालकांना स्क्रिन न दाखविणे.

 • १- ५ वर्षांच्या बालकांना अर्धा तास स्क्रिन दाखविणे.

 • ६ ते पुढील वर्षांच्या बालकांना पालकांनी वेळ निश्चित करावा.

loading image