आंतरराष्ट्रीय बालिका दिन : आजही सावित्रीच्या लेकींची उच्च शिक्षणात होतेय परवड

International Child Day Special
International Child Day Special

पुणे - दौंड तालुक्‍यातील देऊळगाव गाडा हे माझं गाव. दहावी किंवा बारावीनंतरचे शिक्षण घ्यायचं असेल, तर दहा किलोमीटरवर वरवंडला जाण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. त्यातही गावापासून चौफुल्यापर्यंतचे पाच किलोमीटर अंतर पार करण्यासाठी कसलीच सोय नाही. प्रवासाच्या गैरसोयीला आर्थिक अडचण, पालकांकडून केली जाणारी लग्नाची घाई आणि रोडरोमियोंकडून दिला जाणारा त्रास मुलींच्या पाचवीला पुजलेला. यामुळं शिक्षणासाठी परवड होत असल्याचे देऊळगाव येथील वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेली आकांक्षा कळसकर ही विद्यार्थिनी सांगत होती. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अकरा हजार मुलींची जवळपास हिच व्यथा आहे. परिणामी पुणे जिल्ह्यातील सावित्रीच्या लेकी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहू लागल्या आहेत.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली आहे. जगभरात येत्या रविवारी (ता. ११) आंतररराष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात येतो. मुलींना शिक्षण, पोषण, आरोग्य, कायदेशीर हक्क आणि अधिकार मिळावेत, हा यामागचा उद्देश असतो. या पार्श्‍वभूमीवरच मुलींची शिक्षणासाठी होणारी परवड सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने जिल्ह्यात १ हजार ४५५ महिला दक्षता समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समित्यांच्या माध्यमातून गावां-गावातील मुलींना उच्च शिक्षणासाठी येत असलेल्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. यासाठी दहावी व बारावीच्या निकालानंतर गुगल फॉर्मच्या माध्यमातून याबाबत दहावी बारावी उत्तीर्ण मुलींची मते जाणून घेण्यात आली. या सर्वेक्षणात दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या ११ हजार १२१ मुलींनी सहभाग घेतला. यामध्ये दहावीच्या ५ हजार ८८८ व बारावीच्या ५ हजार २३३ मुलींचा समावेश आहे. सहभागी एकूण मुलींपैकी पाच हजार ६०० मुलींनी केवळ आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षण घेता येत नसल्याचे सांगितले. 

मुलींच्या शिक्षणासाठी हवा मदतीचा हात
केवळ आर्थिक सक्षमतेअभावी ग्रामीण भागातील मुलींना मध्येच अर्धवट शिक्षण सोडावे लागत आहे. त्यांच्यासाठी ‘माझे शिक्षण, माझा अधिकार’ या अभियानांतर्गत प्रयत्न कण्यात येत आहेत. त्यासाठी विविध संघटना, सामाजिक संस्था, विश्‍वस्त संस्था आणि दानशूर व्यक्ती आदींची मदत लागणार आहे. तसे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी हे उद्या आकाशवाणीवरून करणार आहेत.

जिल्ह्यात ‘बेटी पढाओ, बेटी बचाव’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत उद्या बालिका दिनी नवविवाहितांच्या घराच्या दारावर ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चे स्टिकर लावले जाणार आहेत. मुलींना आर्थिक चणचणीमुळे शिक्षण मध्येच अर्धवट सोडावे लागत आहे, ही दुदैवी बाब आहे. 
- पूजा पारगे, सभापती, महिला व बालकल्याण, जिल्हा परिषद, पुणे

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com