पुणे विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय; ऑफलाइन परीक्षा केंद्रांवर नसणार 'स्क्वॉड'!

ब्रिजमोहन पाटील
Saturday, 10 October 2020

पुणे विद्यापीठ परीक्षांचे आयोजन करताना गैरप्रकार रोखण्यासाठी खास भरारी पथकांची नेमणूक करत असते, त्यातून कॉपी करणाऱ्यांवर कारवाई केली जाते.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्षाची परीक्षा 50 हजार विद्यार्थी ऑफलाइन माध्यमातून देणार आहेत, पण कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भरारी पथक न नेमण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्याऐवजी महाविद्यालयातीलच परीक्षक नेमण्याच्या सूचना परीक्षा विभागाने महाविद्यालयांना दिल्या आहेत.

स्पर्धा परीक्षेचा पेच सुटणार का? विद्यार्थ्यांसमोर एकच प्रश्‍न

पुणे विद्यापीठाच्या पुणे, नगर आणि नाशिक या कार्यक्षेत्रात यंदा ऑनलाइन आणि ऑफलाइन परीक्षा घेतल्या जाणार आहेत, त्यामध्ये 1 लाख 90 हजार विद्यार्थी ऑनलाइन, तर सुमारे 50 हजार विद्यार्थी ऑफलाइन परीक्षा देणार आहेत. पुणे विद्यापीठ परीक्षांचे आयोजन करताना गैरप्रकार रोखण्यासाठी खास भरारी पथकांची नेमणूक करत असते, त्यातून कॉपी करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. यंदाची परीक्षा 12 ऑक्‍टोबरपासून सुरू होणार आहे. मात्र, ही परीक्षा होत असताना या ठिकाणी महाविद्यालयातीलच पर्यवेक्षक राहणार आहेत. त्यामुळे परीक्षांचे पावित्र्य अबाधित राखण्यादृष्टीने विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने सहकार्य करण्याचे आवाहन महाविद्यालयांना केले आहे.

पुण्यात IAS अधिकारी सुधाकर शिंदे यांचे वयाच्या 34 व्या वर्षी निधन

तिन्ही जिल्ह्यात सुमारे 115 महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्र निश्‍चित केले आहेत. या परीक्षा केंद्रांवर भरारी पथक नसेल. त्यामुळे महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावरच कर्मचारी नियुक्त करून परीक्षांचे पावित्र्य आणि गोपनीयता अबाधित ठेवण्यासाठी महाविद्यालयांनी सहकार्य करावे, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी आदेशात नमूद केले आहे.

एकूण विद्यार्थी - 2,50, 000
ऑनलाइन परीक्षा देणारे - 1, 90, 000
ऑफलाइन परीक्षा देणारे - 50, 000
परीक्षा केंद्र - 115

पुणे विद्यापीठच्या परीक्षा केंद्रांवर यंदा भरारी पथक नसणार आहेत.

पुणे विद्यापीठच्या परीक्षा केंद्रांवर यंदा भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली नाही.

- पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There will be no squads at Pune University offline exam centers due to Coronavirus