हॉटेल-मॉल सुरू झाल्यानंतर शहरात कसं होतं वातावरण? वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 August 2020

मॉलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे तापमान तपासूनच त्यांना आत पाठवण्यात येत होते. तसेच मॉलच्या अंतर्गत भागात गर्दी टाळण्यासाठी काही बदल देखील करण्यात आले आहेत.

पुणे : लॉकडाऊनमुळे गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ बंद असलेले शहरातील मॉल, रूम असलेले हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊस बुधवार (ता.५) पासून सुरू झाले आहेत. या अस्थापना खुल्या झाल्यानंतर पहिल्याच दिवशी हॉटेलांमध्ये शुकशुकाट होता. तर मॉलमध्ये खरेदीसाठी नागरिकांची काहीशी गर्दी झाली होती.

पुणेकरांनो, उद्या जरा जपून; हवामान खात्यानं दिला 'ऑरेंज अलर्ट'

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य ती काळजी घेत शहरातील मॉल, रूम असलेले हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊस सुरू करण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. त्यानुसार या सर्व बाबी सुरू झाल्या असल्या तरी ग्राहकांनी मात्र त्याकडे पाठ फिरविली असल्याचे चित्र बुधवारी शहरात पाहायला मिळाले. मॉल किंवा हॉटेल सुरू करताना महापालिकेने घालून दिलेल्या अटींची याठिकाणी पूर्तता करण्यात आली असल्याचे पाहायला मिळाले.

शेतकऱ्यांचा जीव टांगणीला, तीन जिल्ह्यांसाठीच्या या प्रकल्पाचा साठा चिंताजनक

मॉलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे तापमान तपासूनच त्यांना आत पाठवण्यात येत होते. तसेच मॉलच्या अंतर्गत भागात गर्दी टाळण्यासाठी काही बदल देखील करण्यात आले आहेत. 
खरेदीसाठी आलेल्या अनिता चिमटे यांनी सांगितले की, दुकानांच्या तुलनेत येथे काही वस्तू स्वस्त आणि चांगल्या मिळतात. त्यामुळे मॉल कधी सुरू होतील याची वाट पाहत होते. याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन होत असल्याने खरेदी करताना मनात भीती राहिली नाही.

पगाराची चिंता मिटली : 
शहरातील विविध मॉलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. मॉल बंद असल्याने त्यांचा पगारही थांबला होता. मात्र आता ते खुले झाल्याने काही कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे आता या महिन्याचा का होईना पगार मिळेल, असे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते.

पेटीएम अपडेट करून देतो म्हणाला अन् दोघींना २ लाखांना चुना लावला​

हॉटेलमध्ये राहायला येणार कोण? 
हॉटेल, लॉज किंवा गेस्ट हाउसमध्ये रूम घेणाऱ्या बहुतांश व्यक्ती या दुसऱ्या शहरातील किंवा राज्यातील असतात. मात्र लॉकडाउनमुळे सध्या प्रवासाबाबत अनेक निर्बंध आहेत. तर कामानिमित्त शहरात येणाऱ्यांची संख्या देखील खूपच कमी आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये कोणते ग्राहक येणार असा प्रश्न पडल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malls, hotels, lodges and guest houses in Pune city have started from Wednesday 5th August