कोरोनाबाधितांवर वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांनीच उपचारासाठी दक्षता घेतली : डॉ. काळे

कोरोनाबाधितांवर वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांनीच उपचारासाठी दक्षता घेतली : डॉ. काळे
कोरोनाबाधितांवर वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांनीच उपचारासाठी दक्षता घेतली : डॉ. काळेsakal

कॅन्टोन्मेंट : कोविड-१९ अनस्थेसिया, मेडिसीन, चेस्ट व सर्वच सहायक विभागांसह वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांनीच रुग्णांवर योग्य प्रकारे उपचार करून काळजी घेतली, तसेच वेळेत उपचार केले. त्यामुळेच आपण कोरोनाला परतवू शकलो, असे मत ससून रुग्णायाचे अधीष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी व्यक्त केले.

कोरोनाबाधितांवर वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांनीच उपचारासाठी दक्षता घेतली : डॉ. काळे
प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंगला अटक; 'ती' चूक भोवली

बै. जी. शा. वैद्यकीय महाविद्यालयातील बधिरीकरणशास्त्र विभागाच्या वतीने वर्ल्ड अॅनेस्थिया डे निमित्त १० ते १६ ऑक्टोबर दरम्यान सप्ताहानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी कोविड-१९ मॅनेजमेंट ः ए प्रॅक्टिकल अॅपोर्च या पुस्तकाचे प्रकाशन ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रा. डॉ. संयोगिता नाईक, प्रा. डॉ. सुरेखा शिंदे, संपादक डॉ. विनया कुलकर्णी, डॉ. विंध्या प्रसाद आणि महाविद्यालयातील प्राध्यापक व मान्यवर उपस्थित होते.

डॉ. काळे म्हणाले की, कोविड-१९ मॅनेजमेंट ः अ प्रॅक्टिकल अॅप्रोच या पुस्तकामध्ये आजार आणि उपचार याविषयी विशेष माहिती देण्यात आली आहे. सर्व विद्यार्थ्यांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले. डॉ. सुजीत क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रज्ञा भालेराव यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com