साहित्य बळकटीसाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवे : अरूणा ढेरे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

पुणे : ''प्रकाशनाकडे व्यवसाय म्हणून बघणे काळानुसार गरजेचे आहे. परंतु त्या पलीकडे जाऊन सुदृढ मराठी वाड्‌.मयासाठी काय करता येईल हे पाहणे महत्त्वाचे असून साहित्य बळकटीसाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवे'',असे मत साहित्य संमेलन अध्यक्षा अरूणा ढेरे यांनी व्यक्त केले. 

पुणे : ''प्रकाशनाकडे व्यवसाय म्हणून बघणे काळानुसार गरजेचे आहे. परंतु त्या पलीकडे जाऊन सुदृढ मराठी वाड्‌.मयासाठी काय करता येईल हे पाहणे महत्त्वाचे असून साहित्य बळकटीसाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवे'',असे मत साहित्य संमेलन अध्यक्षा अरूणा ढेरे यांनी व्यक्त केले. 

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या अखिल भारतीय जीवन गौरव पुरस्काराचे वितरण डॉ.अरुणा ढेरे यांच्या हस्ते झाले, यावेळी अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ लेखक आणि संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, उपाध्यक्षा शशिकला उपाध्ये उपस्थित होते. यावेळी यंदा लातूरच्या भारतीय पुस्तकालयाचे संस्थापक संचालक भानुदास जोशी यांना अखिल भारतीय जीवन गौरव पुरस्काराने तर ज्येष्ठ विज्ञान लेखक निरंजन घाटे यांना साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती आणि उत्कृष्ट दिवाळी अंक निर्मिती पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी अरूणा ढेरे बोलताना म्हणाल्या, "पुस्तक लेखनाबरोबरच प्रकाशनाचे कामही महत्त्वाचे असते. पुस्तकामागे प्रकाशकाची दृष्टी आणि सर्जनशीलता असते. त्यामुळे ते संपादक आणि लेखकांची भूमिका बजावत असतात. प्रकाशन व्यवसायात अशा जिद्दीने काम करणारे ऋषीतुल्य व्यक्तिमत्वे आहेत म्हणूनच हा व्यवसाय टिकून आहे. सांस्कृतिक वारसा जपणे आणि तो पुढील पिढीला हस्तांतरीत करणे या दृष्टीने प्रकाशकांचे मोठे योगदान आहे.''

डॉ. मोरे म्हणाले, "लेखकानेच प्रकाशकाची भूमिका न बजावता प्रत्येक घटकाने आपआपले काम करावे. स्वायत्तते बरोबरच समायत्तता देखील मोलाची आहे. प्रकाशन व्यवसायाकडे एका उद्दात्त दृष्टीने पाहिले जाते. प्रकाशन व्यवसायात पूर्वसुरींनी देखील जे उच्चदर्जाचे काम करुन ठेवले आहे, त्याचे स्मरण ठेवले पाहिजे. महाराष्ट्रातील या प्रकाशकीय संस्कृतीवर गांभीर्याने काम होणे आवश्‍यक आहे. प्रकाशन व्यवसाय व्रत म्हणून निष्ठेने करणाऱ्या या प्रकाशकांच्या ऋणातच आपण राहिले पाहिजे."

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Everyone should strive for the strengthening of literature: Aruna Dhhere