मध्य रेल्वेकडून जेजुरीत पाहणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

जेजुरी रेल्वे स्थानकाच्या कामकाजाची व सुरू असलेल्या अन्य कामांची व रेल पथ यंत्रसामग्री प्रदर्शनाची पाहणी मध्य रेल्वे प्रशासनाचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, व्यवस्थापक बी. के. दादाभोय आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी केली.

जेजुरी - जेजुरी रेल्वे स्थानकाच्या कामकाजाची व सुरू असलेल्या अन्य कामांची व रेल पथ यंत्रसामग्री प्रदर्शनाची पाहणी मध्य रेल्वे प्रशासनाचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, व्यवस्थापक बी. के. दादाभोय आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, यात प्रथम रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर जेजुरी गडाच्या नव्याने तयार केलेल्या प्रतिकृतीची पाहणी करण्यात आली. या वेळी पुणे विभागीय रेल्वेच्या सल्लागार समितीचे सदस्य प्रवीण शिंदे, माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई, राजू पानसरे, दिगंबर दुर्गाडे, विराज काकडे आदी उपस्थित होते. जेजुरी रेल्वे स्थानकामध्ये सुधारणा केल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांच्या वतीने प्रवीण शिंदे यांनी रेल्वे अधिकारी यांचा फुले पगडी व संविधान देऊन सन्मान केला. शिल्पकार दिनकर थोपटे यांनी खंडोबा मंदिराची प्रतिमा संजीव मित्तल यांना भेट दिली. प्रवीण शिंदे यांनी आणखी सुधारणांबाबत महाव्यवस्थापकांना निवेदन दिले. रेल्वे स्थानकात प्रथमच छोटी रेल पथ यंत्रसाहित्य प्रदर्शन भरविले होते. त्याचीही पाहणी अधिकारी व ग्रामस्थांनी केली. प्रवेशव्दारावर फुलांच्या माळा, तसेच जेजुरी रेल्वे स्थानकाला खंडोबा गडाच्या प्रवेशव्दाराचे रूप देण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Examine the Central Railway to Jejuri