स्वातंत्र्यपूर्व संस्थानांमधील दुर्मिळ मुद्रांकांचे प्रदर्शन

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत शनिवार (ता.१३) आणि सोमवार (ता.१५) हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
Stamp
Stampsakal
Updated on
Summary

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत शनिवार (ता.१३) आणि सोमवार (ता.१५) हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

पुणे - वस्तूंची खरेदी असो की करारनामा, प्रतिज्ञापत्रासाठी मुद्रांक (स्टॅम्पपेपर) आलाच. ‘भारतीय गैर न्यायिक’ असे छापलेला मुद्रांक आपण नक्की पाहिले असतील. पण, ‘श्रीमच्छत्रपती महाराज’ असे छापलेले भारतीय राजांचे मुद्रांक सर्वसामान्यांच्या दृष्टीस पडणे दुरापास्तच. आता स्वातंत्र्यपूर्व काळातील संस्थानाच्या दुर्मिळ मुद्रांक पाहण्याची संधी सर्वांना उपलब्ध झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने दुर्मिळ मुद्रांकांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत शनिवार (ता.१३) आणि सोमवार (ता.१५) हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे, अशी माहिती इतिहासाच्या विभागप्रमुख डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांनी दिली आहे. त्या म्हणतात, ‘देशाच्या मोठ्या भूप्रदेशावर इंग्रजांचे मांडलिक असणाऱ्या संस्थानिकांचं राज्य होतं. संस्थानाच्या राज्यकर्त्यांची वैशिष्ट्य स्पष्ट करणारे असे मुद्रांक म्हणजे स्टॅम्प पेपर संस्थानातर्फे छापले जात.

संस्थानांमधल्या प्रजाजनांनी कोणतेही करार केले, वस्तू विकल्या खरेदी केल्या, गहाण ठेवल्या तर त्याची नोंद या स्टॅम्प पेपरवरच केली जात असे. त्यामुळे स्टॅम्प पेपर हे आधुनिक भारतीय इतिहास समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं साधन आहे.’ जयसिंगपूरमधील राजकुमार खुरपे यांनी गेल्या २० वर्षांमध्ये विविध २०० संस्थानांच्या सुमारे १५०० स्टॅम्प पेपरचा संग्रह त्यांनी केलेला आहे. त्यांच्या संग्रहामध्ये भारतातल्या २०० संस्थानिकांचे स्टॅम्प पेपर सुव्यवस्थितपणे ठेवलेले आहेत. विद्यापीठाच्या इतिहास विभागातील अभ्यासकांसाठी त्यांनी १०१ मुद्रांक भेट दिले आहेत. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com