PMPML Bus : कात्रज आगाराकडील सात बसमार्गांचा वर्षभरात विस्तार; प्रवास सुखकर हाेणार

कात्रजवरून या विस्तारित आणि नवीन सुरु केलेल्या एकूण सात मार्गांवर प्रवाशांकडूनही उत्स्फुर्द प्रतिसाद मिळत आहे.
expansion of seven bus routes from Katraj travel pmpml pune
expansion of seven bus routes from Katraj travel pmpml pune
Updated on

कात्रज : पीएमपीच्या कात्रज आगाराकडून मागील वर्षभरात विस्तारित केलेल्या बसमार्गांवर पीएमपीला चांगले उत्पन्न प्राप्त होत आहे. त्याचबरोबर, या बसमार्गांमुळे प्रवाशांचा प्रवासही सुखकर झाल्याचे दिसून येत आहे.

कात्रज आगाराकडून मागील वर्षभरात धनकवडी ते शिवाजीनगर, पद्मावती ते पुणे स्टेशन या नवीन मार्गांसह राजस सोसायटी ते शिवाजीनगर, भारती विद्यापीठ ते शनिवारवाडा (वर्तुळ), तळजाई पठार ते पुणे स्टेशन, धनकवडी ते न.ता.वाडी, धनकवडी ते पुणे स्टेशन या पाच बसमार्गांचा विस्तार करण्यात आला आहे.

कात्रजवरून या विस्तारित आणि नवीन सुरु केलेल्या एकूण सात मार्गांवर प्रवाशांकडूनही उत्स्फुर्द प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये तळजाई पठार ते पुणे स्टेशन वगळता सर्व मार्गांवर प्रतिकिमी सरासरी उत्पन्नाप्रमाणे पीएमपीला उत्पन्न मिळत आहे.

expansion of seven bus routes from Katraj travel pmpml pune
Pune News : आवास योजनेच्या लोकार्पणाला पंतप्रधानांच्या दौऱ्याचा मुहूर्त ?

लांब पल्ल्याचे हे मार्ग झाल्याने प्रवाशांना बस बदलण्याची गरज नाही. त्याचबरोबर, दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी या मार्गावर दैनंदिन किंवा मासिक पासची सेवाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मार्ग क्रमांक-मार्ग- सरासरी उत्पन्न(प्रतिकिमी)-मार्गावरील सरासरी शेड्युल

२६-धनकवडी ते शिवाजीनगर-५८.८५-६०

३१-तळजाई पठार ते पुणे स्टेशन-३४.४२-३०

३१ए-पद्मावती ते पुणे स्टेशन-४७.०४-१५

३८-धनकवडी ते न.ता.वाडी-५८.३१-१७०

३९-धनकवडी ते पुणे स्टेशन-४५.८०-७०

२१६-भारती विद्यापीठ ते शनिवारवाडा (वर्तुळ)- ४३.६४-११५

२९७-राजस सोसायटी ते शिवाजीनगर-४५.७९-३०

expansion of seven bus routes from Katraj travel pmpml pune
Transgender Protest In Pune : राणेंचा 'तो' शब्द अन् तृतीयपंथीयांचा कोप…; रस्त्यावर उतरून केलं जोडे मारो आंदोलन

सुरवातीला हे मार्ग कमी पल्ल्याचे होते. मात्र, प्रवाशांच्या मागणीनंतर विचारपूर्वक या मार्गांचा विस्तार करण्यात आला. याचा फायदा हा प्रवाशांना आणि पीएमपीलाही होताना दिसत आहे. यामध्ये एक मार्ग वगळता सर्व मार्गांवर सरासरीच्या पुढे उत्पन्न मिळत आहे. येणाऱ्या काळात आणखी काही मार्ग विस्तारित करत आणखी चांगली सेवा देण्याचा आमचा मानस आहे.

- गोविंद हांडे, आगारप्रमुख, कात्रज.

राजस सोसायटीतून शिवाजीनगरला जाण्यासाठी स्वारगेटला उतरुन जावे लागायचे मात्र, आता हा बसमार्ग शिवाजीनगरपर्यंत विस्तारित झाल्याने फायदा होत आहे. स्वारगेटला काम असेल तर तिथपर्यंत आणि थेट शिवाजीनगरलाही जाता येते. याचा अधिक फायदा आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थी महिलांसह ज्येष्ठ नागरिक घेताना दिसत आहेत.

- हेमंत धायबर, अध्यक्ष, राजस सोसयटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com