esakal | पीएचडी गाईडसाठी अनुभवाची अट होणार ‘शून्य’ ?

बोलून बातमी शोधा

pune university}

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएचडीसाठी गाइड म्हणून मान्यता मिळविण्यासाठी किमान तीन ते पाच वर्षाची अट आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नियमाचे उल्लंघन होत आहे.

pune
पीएचडी गाईडसाठी अनुभवाची अट होणार ‘शून्य’ ?
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएचडीसाठी गाइड म्हणून मान्यता मिळविण्यासाठी किमान तीन ते पाच वर्षाची अट आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नियमाचे उल्लंघन होत आहे. याबाबत तक्रारी गेल्याने ही अटी रद्द करण्यासाठी विद्यापीठाकडून समिती नियुक्त केली आहे. पुढील आठवड्याभरात त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर याबाबत स्पष्टता येणार आहे.

पुणे विद्यापीठातून मिळवलेल्या पीएचडीला विशेष महत्त्व आहे. पण अनेक विषयांना कमी गाइड असल्याने अनेकांना पीएचडीसाठी प्रवेश मिळत नाही. ‘यूजीसी’ने २०१६ मध्ये काढलेल्या परिपत्रकात पीएचडी मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळविण्यासाठी कोणतीही अट टाकलेली नाही. त्यानुसार सर्व विद्यापीठांनी त्याची अंमलबजावणी करणे आवश्‍यक होते. मात्र, पुणे विद्यापीठाने पीएचडी गाइड होण्यासाठी पीएचडी झाल्यापासून तीन वर्षे शैक्षणिक अनुभव किंवा नियुक्तीच्या वेळी पीएचडी असल्यास पाच वर्षांच्या शैक्षणिक अनुभवाची अट घातली आहे. यूजीसीच्या नियमाप्रमाणे त्यात बदल करण्यात आलेला नव्हता. तत्कालीन कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी दिले होते.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पीएचडी प्राप्त सहायक प्राध्यापकांना संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता देण्याचा ठराव विद्यापीठाने मंजूर केला. त्यामध्ये अनुभवाची अट टाकलेली नव्हती. पण शैक्षणिक विभागाने नियमावली करताना सहायक प्राध्यापकाने सेवेत रुजू झाल्यानंतर पीएचडी पूर्ण केल्यास तीन वर्षांचा आणि सेवेत रुजू होताना पीएचडी असल्यास पाच वर्षांचा अनुभव पाहिजे, अशी अट घातली आहे.

याविरोधात भारतीय इलिजिबल स्टुडंट अँड टीसर्च असोशिएशचे (बेस्टा) अध्यक्ष अजय दरेकर व सचिव डॉ. संतोष पाटील यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे तक्रार केली होती. ‘यूजीसी’च्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने पुणे विद्यापीठाने ही नियमावली बदलण्यासाठी समिती गठित केली आहे. त्याचा अहवाल पुढील आठवड्याभरात येऊन परिपत्रक निघेल असे सूत्रांनी सांगितले.

‘‘पुणे विद्यापीठाने पीएचडी गाईडसाठी अनुभवाची अट टाकल्याने तरुणांना यापदासाठी पात्र होता येत नव्हते. विद्यापीठाने ही अट रद्द करावी म्हणून पाठपुरावा केला पण त्यास नकार दिला होता. याबाबत उदय सामंत यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर विद्यापीठाने तयारी दाखवली आहे.’’
- अजय दरेकर, अध्यक्ष, बेस्टा