प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे - दादा भुसे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

सर्व तालुक्‍यांत मार्गदर्शन केंद्र
कृषी विद्यापीठांचे संशोधन शेतकऱ्यांच्या बांधावर पोचविण्यासाठी कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठ यांनी समन्वयाने काम करावे. विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अधिक भर द्यावा, अशा सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी किेल्या. सरकारने राज्यातील सर्व तालुक्‍यांत शेतकरी सन्मान आणि मार्गदर्शन केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक तालुक्‍यात या केंद्राची स्थापना तातडीने करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे - संशोधन करून नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा इतर शेतकऱ्यासांठी प्रेरणादायी आहेत. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठांनी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले. दरम्यान, राज्य सरकार शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टयिा सक्षम करण्यासोबतच त्यांना चिंतामुक्त करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

येथील कृषी महाविद्यालयात मंगळवारी (ता. २८) कृषिमंत्री भुसे यांनी महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद आणि राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या कामकाजाचा आढावा घेतला. कृषी परिषदेचे उपाध्यक्ष हरिभाऊ जावळे, कृषी परिषदेचे महासंचालक विश्वजित माने, संशोधन संचालक हरिहर कौसडीकर यांच्यासह चारही कृषी विद्यापीठांचे प्रमुख शास्त्रज्ञ उपस्थित होते.

कोरोना व्हायरसचे दोन संशयित पुण्यात; नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल

भुसे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांची कौटुंबिक अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी कृषी विभागांसह कृषी विद्यापीठांचे प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना आवश्‍यक संशोधनावर भर द्यावा. कृषी विद्यापीठांच्या संशोधन कार्याला निधी कमी पडू देणार नाही. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्‍यातील राहीबाई पोपेरे यांनी देशी बियाणे संवर्धन, नगर तालुक्‍यातील शेतकरी विष्णू जरे यांनी लसणाच्या वाणाचे संशोधन केले आहे. पालघर जिल्ह्यात महिला अत्यंत चांगल्या पद्धतीने मोगरा फुलशेती करतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठांनी मदत करावी.’’

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे शास्त्रज्ञ व अधिकारी या वेळी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Experienced farmers should be encouraged dada bhuse