कोरोना व्हायरसचे दोन संशयित पुण्यात; नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

चीनमध्ये थैमान घालणाऱ्या "कोरोना' रोगाच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारपर्यंत (ता. 27) मुंबई विमानतळावर 3997 प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे. यातील 18 प्रवासी महाराष्ट्रातील असून दोन संशयितांना नायडू रुग्णालयात, तर एकाला नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले आहे.

पुणे - चीनमध्ये थैमान घालणाऱ्या "कोरोना' रोगाच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारपर्यंत (ता. 27) मुंबई विमानतळावर 3997 प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे. यातील 18 प्रवासी महाराष्ट्रातील असून दोन संशयितांना नायडू रुग्णालयात, तर एकाला नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुंबईतील पाच प्रवाशांना सौम्य सर्दी व ताप असल्याने खबरदारी म्हणून कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तर तीन प्रवाशांचे प्रयोगशालेय नमुने निगेटिव्ह आल्याचे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) यांनी कळविले आहे. त्यानुसार त्यांना पुणे व नांदेड येथील रुग्णालयांत पाठविण्यात आले आहे. या सर्व संशयित रुग्णांचे नमुने एनआयव्ही येथे पाठविण्यात आले असून उर्वरित प्रवाशांचे प्रयोगशाळा निदान मंगळवारपर्यंत प्राप्त होईल, अशी माहिती एनआयव्हीकडून देण्यात आली. 

चीनमध्ये कोरोना व्हायरसचे थैमान; भारताचा मोठा निर्णय

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार करोना बाधित देशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रिनिंग मुंबईसह देशातील सात विमानतळांवर सुरू करण्यात आले आहे. या स्क्रिनिंगमध्ये आढळलेल्या संशयित रुग्णांना विलगीकरण कक्षामध्ये भरती करण्याची सुविधा कस्तुरबा रुग्णालय मुंबई तसेच, नायडू रुग्णालय पुणे येथे करण्यात आली आहे. 

महाराष्ट्रातील पाण्याचा एकही थेंब गुजरातला जाऊ देणार नाही : भुजबळ

करोना बाधित देशातून भारतामध्ये येत आहेत. त्यांची माहिती दैनंदिन स्वरूपामध्ये विमानतळ आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत राज्य आरोग्य विभागास कळविली जात आहे. या सर्व प्रवाशांचा ते बाधित देशातून आलेल्या तारखेपासून पुढील 28 दिवस दैनंदिन पाठपुरावा करण्यात येतो. या दैनंदिन पाठपुराव्यामध्ये एखाद्या प्रवाशांमध्ये संशयित कोरोना आजाराची लक्षणे आढळल्यास त्याला विलगीकरण कक्षात भरती करण्याबाबत संबंधितांना सूचित करण्यात आले आहे. 

माहिती वेबसाईटवर 
नागरी विमान वाहतूक विभाग, नगर विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य या सर्व विभागांचा नियमित समन्वय साधून या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या www.mohfw.gov.in या संकेतस्थळावर याची माहिती उपलब्ध आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus two suspected patients admitted at naidu hospital pune