ब्यूटी, स्पासाठी घ्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

सेमिनारविषयी...
कधी : ६ व ७ ऑगस्ट २०१९
वेळ : सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत
कोठे :  हॉटेल हयात रिजेन्सी, विमाननगर, पुणे
रजिस्ट्रेशनसाठी संपर्क : ९८२२३३३३८२

पुणे - लीज्‌ इन्स्टिट्यूट गेली पाच वर्षे आंतरराष्ट्रीय ब्यूटी आणि स्टाइल सेमिनार आयोजित करीत आहेत. ब्यूटिशियन्स व हेअर ड्रेसर व मेकअप आर्टिस्ट व स्पा थेरपिस्ट यांच्यासाठी ते अतिशय फायद्याचे आहेत. या क्षेत्रातील नामवंत डॉ. ब्लॉसम कोचर, लीना खांडेकर व जॅकलिन केनेडी (स्वित्झर्लंड) या शिकविणार आहेत. सेमिनारनंतर इंटरनॅशनल आर्टिस्टचे पेड वर्कशॉप होतील. 

सेमिनारचे विषय : अरोमा ट्रिटमेंट व ग्वाशा फेशिअल व प्रोटिन हेअर ट्रिटमेंट व अेज डिफायनिंग सिग्नेचर फेशिअल व फोर लेअर केमिकल पिल ट्रिटमेंट व ॲडव्हान्स फेस ॲण्ड बॉडीमशिन ट्रिटमेंट व एचडी व थ्रीडी मेकअप, एअरब्रश व अरॅबिक आय मेकअप, इंटरनॅशनल हेअर स्टाइल शिकविल्या जातील. तसेच ब्रायडल मेकअप व हेअर कटिंग व हेअर स्टाइल, फेशिअल अशी स्पर्धाही होणार आहे. विजेत्यांना नियमाप्रमाणे परदेशात तसेच भारतात ॲडव्हान्स ट्रेनिंग दिले जाईल. 

इंटरनॅशनल लीज्‌ ब्युटी आणि स्पा इन्स्टिट्यूटला सिडेस्को या आंतरराष्ट्रीय स्वित्झर्लंड मानांकित तसेच सिबटॅक लंडन मानांकित संस्थेची मान्यता प्राप्त आहे. ब्यूटी हेअर मेकअप तसेच स्पा आणि सलून मॅनेजमेंट या विषयांवरील तीन महिने ते एक वर्षाचे कोर्सेस लीज इन्स्टिट्यूटमध्ये घेतले जातात व आंतरराष्ट्रीय परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्या विद्यार्थिनींना त्याचे आंतरराष्ट्रीय सर्टिफिकेटही मिळते. खांडेकर म्हणाल्या, की भारताच्या अनेक भागांमधून अनेक विद्यार्थिनींना लीज इन्स्टिट्यूटतर्फे मार्गदर्शन मिळाले आहे. त्या विद्यार्थिनी उत्तम जॉब करीत आहेत. तसेच स्वतःचे सलून व इन्स्टिट्यूट चालवत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Expert guidance for Beauty and Spa