Pune News : 'पाकिस्तान जिंदाबाद' घोषणेच्या व्हिडिओ प्रकरणी पुणे पोलिसांचं स्पष्टीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune News

Pune News : 'पाकिस्तान जिंदाबाद' घोषणेच्या व्हिडिओ प्रकरणी पुणे पोलिसांचं स्पष्टीकरण

पुण्यात काल पीएफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून 'पाकिस्तान जिंदाबाद' अशा कथीत घोषणाबाजीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सुरुवातीला पुणे पोलिसांनी यावर मौन बाळगलं होतं, पण मीडियातून हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यावर आता पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. (Explanation give by Pune Police on controversial video of sloganeering)

हेही वाचा: Mohali MMS News: मोहाली MMS कांड प्रकरणी सैन्यातील जवानाला अटक!

पुणे पोलीस उपायुक्त सागर पाटील म्हणाले, "आमच्याकडे कालच्या घटनेचे काही व्हिडिओ आले आहेत, या व्हिडिओंची सत्यता आम्ही पडताळतोय तसेच त्याचा तपासही करण्यात येईल"

हेही वाचा: चीनमध्ये राजकीय भूकंप? राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना नजरकैदेत ठेवल्याची चर्चा

'पाकिस्तान जिंदाबाद', 'अल्ला हूं अकबर' अशा घोषणांचे व्हिडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाले. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काल पीएफआय संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं, या आंदोलनातील हे व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचा: गेहलोतांची खेळी देणार सचिन पायलटांनां झटका; भंगणार मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न?

दरम्यान, या आंदोलनाला परवानगी नसताना गर्दी जमा केल्यानं पोलिसांनी पीएफआयच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी नारेबाजी करताना 'पाकिस्तान जिंदाबाद' अशा घोषणा लगावल्या होत्या.