esakal | प्रयोग करा-उत्तरे द्या स्पर्धेचा निकाल जाहीर

बोलून बातमी शोधा

Explore-and-Explain-Quiz}

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने ‘सकाळ’ व ‘संडे सायन्स स्कूल’च्या वतीने स्वतः प्रयोग करून उत्तरे देण्याची अत्यंत अनोखी ‘एक्सप्लोर अँड एक्सप्लेन’ या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना प्रयोगाचे साहित्य घरपोच पाठविले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयोग करून प्रश्नांची उत्तरे शोधली.

प्रयोग करा-उत्तरे द्या स्पर्धेचा निकाल जाहीर
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने ‘सकाळ’ व ‘संडे सायन्स स्कूल’च्या वतीने स्वतः प्रयोग करून उत्तरे देण्याची अत्यंत अनोखी ‘एक्सप्लोर अँड एक्सप्लेन’ या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना प्रयोगाचे साहित्य घरपोच पाठविले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयोग करून प्रश्नांची उत्तरे शोधली. या प्रक्रियेत त्यांचे  प्रयोग कौशल्य, सर्वांगीण आकलनशक्ती, निरीक्षण क्षमता या सर्व बाबींचा कस लागला. इ. १ ली  ते ३ री, इ. ४ थी ते ६ वी आणि इ. ७ वी ते ९ वी या ३ गटांसाठी घेतल्या गेलेल्या स्पर्धेत पुण्यासह सुमारे २० शहरातून व ४ राज्यातून ६०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विजेत्यांना ‘सायन्स विझार्ड’ किताब व ट्रॉफी दिली जाणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तसेच विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मेडल व सर्टिफिकेट दिले जाणार आहे. मागील ११ वर्षांपासून ‘सकाळ’ व ‘संडे सायन्स स्कूल’च्या वतीने अनेक वैज्ञानिक उपक्रम राबविले जातात. आगामी उपक्रमांची माहिती मिळविण्यासाठी ९८५००४७९३३ या क्रमांकावर विद्यार्थ्यांचे नाव व इयत्ता असा व्हाट्सअप मेसेज करावा.

मोफत ऑनलाइन सैन्य, पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण; अर्जाची प्रक्रिया सुरु

विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे
इ. १ ली  ते ३ री - सायन्स विझार्ड विजेता (विभागून) अनुलेखा नंबियार व शौनक ओखडे, द्वितीय क्र.अक्ष बंका,  तृतीय क्र- ओम पाटील
इ. ४ थी ते ६ वी - सायन्स विझार्ड विजेता अथर्व कोकाटे, द्वितीय क्र. आकाश येरागी, तृतीय क्र (विभागून) - साक्षी शिंदे आणि स्वामिनी धुळे  
इ. ७ वी ते ९ वी - सायन्स विझार्ड विजेती वैष्णवी जाधव, द्वितीय क्र. अवनी पांढारकर, तृतीय क्र (विभागून) वेद घरडे आणि श्रेया मुनोत,

भोरमध्ये शेतकऱ्यांच्या डोक्याला ताप; एजंटांचे फोन करतायत हैराण

स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे
इ. १ ली  ते ३ री - दर्श मंगल, रोहिणी बडोलिया, आरंभ साबळे, श्रेयस डोळस, श्रीयोग भावसार, सौम्या भोपे, सुश्रुत बुटाला, अर्णव पाटील, त्रिशा चौहान, अनुश्री लोखंडे, विहान आंबोळे, सनाया संसारे
इ. ४ थी ते ६ वी - नैतिक चव्हाण, अर्णव मिश्रा, आदिती लांडगे, अनुश्री फरांदे, राजवी शिंदे, मिताली निक्षे, आर्यन घोडके, कृष्णा दुधानकर, आदित्य वडके, अवधूत हजारे, शाश्वत जैन, अमीर्थवर्षीनी
इ. ७ वी ते ९ वी - अनुश्री पोतनीस, चिन्मय लोणकर, सोहम पुराणिक, पार्थ पुराणिक, तेजस आडगावकर, आर्यन मोकल, सान्वी नाईक, सिद्धी टिंबे.

Edited By - Prashant Patil