पुणे : हायटेंशन तारांचा स्फोट; तीन महिलांसह दोन मुली जखमी, एक गंभीर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

अतिउच्चदाब वाहिनीचा स्फोट होऊन धायरी येथील समतानगर झोपडपट्टीतील एक महिला गंभीर जखमी झाली.तर अन्य दोन महिला आणि दोन लहान मुली किरकोळ जखमी झाल्या.

पुणे : अतिउच्चदाब वाहिनीचा स्फोट होऊन धायरी येथील समतानगर झोपडपट्टीतील एक महिला गंभीर जखमी झाली. तर अन्य दोन महिला आणि दोन लहान मुली किरकोळ जखमी झाल्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पद्मिनी वायदंडे ( वय 46) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी 11 वाजता ही घटना घडली. वायदंडे या सकाळी घराच्या गलरीमध्ये कपडे वाळत घालण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्या घरावरून अतिउच्चदाब वाहिनी जाते. तीचा स्फोट झाला. त्यातून आलेल्या वीज प्रवाहामुळे वायदंडे या गंभीर जखमी झाल्या.

सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न देण्याची मागणी

सहा महिन्यांपूर्वी असाच प्रकार या झोपडपट्टीत झाला होता. त्यामध्ये एक दहा वर्षांची मुलगी जखमी झाली होती. ही वीजवाहिनी भूमिगत करावी, अशी मागणी तेथील नागरिकांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Explosion of High tension wire in dhayari Pune Five women were injured

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: