पुणे : सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न देण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

पुणे : आझाद हिंद सेनेचे प्रवर्तक नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. अशा भारताच्या महान सुपूत्रास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन भारतरत्न द्यावा. तसेच, त्यांचे जपान आणि भारतात स्मारक उभे करण्यात यावे, अशी मागणी इंडो-जपान असोसिएशनचे संस्थापक कार्याध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांनी बुधवारी (ता. 22) केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे सचिव प्रा. विनोदकुमार जाधव या पत्रकार परिषदेस उपस्थित होते. देशमुख म्हणाले, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 23 जानेवारी रोजी जयंती आहे. त्यामुळे देशातील विविध भागांमधून त्यांना भारतरत्न देण्याची मागणी होत आहे.

म्हणून त्यांनी मुलाचे नावच ठेवले 'काँग्रेस'

नेताजी बोस यांची कर्मभूमी जपान असल्यामुळे तेथेही त्यांचे स्मारक उभारण्यात यावे. यासाठी जपान येथील अकुज नोरी मसासा या शेतकऱ्याने दोन एकर जागा दान दिली आहे. तसेच, नेताजींच्या अस्थी जपानमध्ये टोकियो येथील रेन्कोजी मंदिरात आहेत. त्यांच्या अस्थी भारतात आणून आपल्या देशात आणि जपानमध्ये त्यांचे स्मारक उभे करावे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indo-Japan Association demands to give Bharat Ratna for Subhash Chandra Bose