Pune Station | मोठी बातमी! पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू, तासाभरानंतर वाहतूक सुरळीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Railway Station

मोठी बातमी! पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू, तासाभरानंतर वाहतूक सुरळीत

पुणे रेल्वे स्थानकावर शुक्रवारी सकाळी पावणे अकरा वाजता बॉम्बसदृश्य वस्तू आढळली. या वस्तूमध्ये स्फोटकाच्या स्वरुपातील वस्तू असून त्या निकामी करण्यासाठी बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (बिडीडीएस) बी.जे.वैद्यकीय महाविद्यायाच्या मैदानात नेल्या आहेत. (Explosive Found on Pune Railway Station)

यानंतर तत्काळ प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वर वाहतूक थांबवण्यात आली आहे. दोन्ही फलाटं रिकामी करण्यात आली आहेत. घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक असून सर्व नागरिकांना परिसरापासून लांब पाठवण्यात आलं आहे. सध्या पोलीस याठिकणी पोहोचले असून बॉम्ब डिफ्युज करणाऱ्या पथकाने तत्काळ कार्यवाहीला सुरुवात केली आहे. (Pune CP Amitabh Gupta Visits Railway Station)

घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक असून सर्व नागरिकांना परिसरापासून लांब पाठवण्यात आलं आहे.

घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक असून सर्व नागरिकांना परिसरापासून लांब पाठवण्यात आलं आहे.

पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शुक्रवारी सकाळी पावणे अकरा वाजता पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याची खबर मिळाली. त्यानंतर नियंत्रण विभागाकडून याबाबत तत्काळ बंडगार्डन पोलिस, बॉम्ब शोधक पथक यांना माहिती देण्यात आली. दरम्यान, पुणे पोलिस, रेल्वे पोलीस, जीआरपीएफ, आरपीएफ, अग्निशामक दल स्थानकावर दाखल झाले. त्यांनी तत्काळ रेल्वे स्थानक मोकळे केले. तसेच पुणे रेल्वे स्थानकावर येणाऱ्या रेल्वे गाड्या ही थांबवण्यात आल्या.

दरम्यान, बॉम्ब शोधक पथक रेल्वे स्थानकावर दाखल झाले. रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक एकच्या जवळ एक संशयास्पद वस्तू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार, बिडीडीएसने तेथे तपासणी केली. तेव्हा तेथील पिशवीमध्ये तीन जिलेटीनच्या कांड्यासदृश वस्तू असल्याचं त्यांच्या निदर्शनात आलं. मात्र आयुक्तांनी अद्याप याला दुजोरा दिलेला नाही.

बीडीडीएसने तत्काळ या कांड्या अतिशय काळजीपूर्वक ताब्यात घेऊन त्या निकामी करण्यासाठी बी. जे.वैद्यकीय महाविद्यायाच्या मैदानात नेल्या आहेत. तेथे या कांड्या निकामी करण्याचे काम सुरू आहे.दरम्यान, प्रारंभी बिडीडीएस व पोलीस यांच्या कडून नेहमीप्रमाणे मोकड्रिल असल्याचे वाटले. मात्र तेथे जिलेटीन हे स्फोटक असल्याचे समजल्यानंतर पोलिस यंत्रणा अधिक सतर्क झाल्या.

रेल्वे स्थानकाजवळील मैदानात ही वस्तू नेण्यात आली आहे.

रेल्वे स्थानकाजवळील मैदानात ही वस्तू नेण्यात आली आहे.

हेही वाचा: मुंबई पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, दोन किलोमीटर पर्यंत रांगा

. या घटनेची माहिती मिळताच बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचले आहे.

. या घटनेची माहिती मिळताच बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचले आहे.

रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी परिसरात बी बॉम्बसदृश वस्तू सापडली. ही स्फोटके नक्की कोणत्या स्वरुपाची आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेची माहिती मिळताच बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचले आहे. या घटनेनंतर सुरक्षायंत्रणांनी वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत. तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता याठिकाणी तातडीने पोहोचले आहेत. (Pune Police Commissioner)

तसेच पुण्याकडे येणाऱ्या सर्व ट्रेन थांबवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. रेल्वे फलाटावर प्रवाश्यांना फिरकण्यास बंदी घालण्यात आली आहे. दोऱ्यांच्या सहाय्याने या ठिकाणी बॅरिगेडिंग करण्यात आलंय.

याशिवाय पुणे स्टेशनच्या परिसरातील वर्दळ कमी करण्यात आली आहे.

याशिवाय पुणे स्टेशनच्या परिसरातील वर्दळ कमी करण्यात आली आहे.

याशिवाय पुणे स्टेशनच्या परिसरातील वर्दळ कमी करण्यात आली असून नागरिकांना स्टेशनपासून लांब करण्यात आलंय. अनेक प्रवाशांना स्टेशन परिसरातून बाहेर काढण्यात आले आहे. पुणे स्टेशन वर मोठा पोलीस बंदोबस्त आहे. रेल्वे स्टेशन परिसराची तपासणी सुरू झालीय.

Web Title: Explosive Found On Pune Railway Station

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune railway station
go to top