जुन्या नोटा स्वीकारण्यास महावितरणकडून मुदतवाढ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

पुणे - वीजबिलाचा भरणा करण्यासाठी जुन्या पाचशे व एक हजार रुपयाच्या नोटा स्वीकारण्याची मुदत राज्य सरकारने आणखी वाढविली आहे. त्यानुसार येत्या 24 नोव्हेंबरपर्यंत घरगुती व वैयक्तिक ग्राहकांच्या वीजबिलासाठी महावितरणकडून जुन्या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत. 

पुणे परिमंडलातील 501 वीजबिल भरणा केंद्रांतील वीज ग्राहकांनी 10 ते 14 नोव्हेंबर दरम्यान एकूण 46 कोटी 5 लाख रुपयांचा भरणा केला आहे. ग्राहकाचे वीजबिल जेवढ्या रकमेचे आहे तेवढ्याच रकमेच्या जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यात येतील. वीजबिलापोटी आगाऊ स्वरूपात (ऍडव्हान्स पेमेंट) नोटा स्वीकारण्यात येणार नाहीत. 

ग्राहकांना त्वरित वीजबिल भरता यावे, यासाठी आवश्‍यक पूर्वतयारीसह राज्यातील सर्वच केंद्रांवर महावितरणच्या नियमित कर्मचाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती केली आहे. हे कर्मचारी जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी ग्राहकांचे अर्ज भरून देण्यास सहकार्य करतील. हे अर्ज महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. याशिवाय घरबसल्या ऑनलाइन वीजबिल भरण्यासाठी महावितरणचे www.mahadiscom.in संकेतस्थळ व मोबाईल ऍपची सुविधा उपलब्ध आहे.

Web Title: Extended from mseb to accept old notes