
पुणे महानगरपालिकेच्या विविध पदांच्या भरतीसाठी महापालिकेने मुदतवाढ केली आहे. त्यानुसार आता 13 एप्रिल 2024 पर्यंत उमेदवारांना विविध पदांसाठी अर्ज करता येणार आहे.
Pune Municipal Recruitment : पुणे महानगरपालिकेच्या पद भरतीसाठी मुदतवाढ
पुणे - पुणे महानगरपालिकेच्या विविध पदांच्या भरतीसाठी महापालिकेने मुदतवाढ केली आहे. त्यानुसार आता 13 एप्रिल 2024 पर्यंत उमेदवारांना विविध पदांसाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक उमेदवाराना नोकरीची संधी मिळू शकणार आहे.
पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणत पदभरती करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने सहा मार्च रोजी वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यासाठी उमेदवारांना 28 मार्च पर्यंत अर्ज सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र अधिकाधिक उमेदवारांनी अर्ज सादर करावा, यासाठी प्रशासनाने मुदतवाढ केली आहे. त्यानुसार आता उमेदवारांना विविध पदांसाठी 13 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.