पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक सादर करण्यासाठी आयुक्तांना मुदतवाढ

पुणे महापालिकेचा आगामी २०२२-२३ या वर्षाचे अंदाजपत्रक मांडण्यासाठी महापालिका आयुक्तांनी मागितलेली मुदतवाढ सत्ताधारी भाजपने केली.
pune municipal
pune municipalsakal
Summary

पुणे महापालिकेचा आगामी २०२२-२३ या वर्षाचे अंदाजपत्रक मांडण्यासाठी महापालिका आयुक्तांनी मागितलेली मुदतवाढ सत्ताधारी भाजपने केली.

पुणे - पुणे महापालिकेचा (Pune Municipal) आगामी २०२२-२३ या वर्षाचे अंदाजपत्रक (Budget) मांडण्यासाठी महापालिका आयुक्तांनी (Municipal Commissioner) मागितलेली मुदतवाढ 9Time Expension) सत्ताधारी भाजपने (BJP) केली. आयुक्तांना आता २२ फेब्रुवारीऐवजी ७ मार्च रोजी अंदाजपत्रक सादर करता येणार आहे.

पुढील दोन तीन महिन्यात महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी पुणेकरांना खूष करण्यासाठी भाजपकडून अर्थसंकल्प मांडला जाईल अशी चर्चा भाजपमध्ये सुरू होती. मात्र, गेल्या महिन्याभरात प्रभाग रचनेचे कामामुळे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम अर्धवट राहिले.

pune municipal
पुणे : वैद्यकीय महाविद्यालयाचा ४१ कोटीचा निधी योजनांसाठी वळवला

त्यामुळे आयुक्त विक्रम कुमार यांनी ७ मार्च पर्यंत मुदतवाढ मागितली होती. ही मुदतवाढ दिल्यास भाजपच्या स्थायी समिती अध्यक्षांना त्यांचा अर्थसंकल्प मांडता येणार नव्हता, त्यामुळे याबाबत भाजप काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले होते.

अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार आयुक्तांनी दरवर्षी १५ जानेवारी पूर्वी अर्थसंकल्प सादर करणे आवश्यक असते. परंतु आयुक्तांनी २२ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करण्याची परवानगी स्थायी समितीला मागितली होती, ती परवानगी दिल्यानंतर पुन्हा एकदा ७ मार्च रोजी सादर करण्यासाठी परवानगी मागितली होती. ती मान्य केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com