पुणे : वैद्यकीय महाविद्यालयाचा ४१ कोटीचा निधी योजनांसाठी वळवला

वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामासाठी केलेल्या तरतुदीतून ४१ कोटी रुपयांचे वर्गीकरण करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.
Fund
FundSakal
Summary

वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामासाठी केलेल्या तरतुदीतून ४१ कोटी रुपयांचे वर्गीकरण करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

पुणे - पुणे महापालिकेतर्फे (Pune Municipal) राबविण्यात येणाऱ्या शहरी गरीब वैद्यकीय सहाय योजना, (Medical Scheme) अंशदायी वैद्यकीय साहाय्य योजनांचा निधी (Fund) संपल्याने नागरिकांची व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची गैरसोय होत होती, या योजनांसाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामासाठी केलेल्या तरतुदीतून ४१ कोटी रुपयांचे वर्गीकरण करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

शहरी गरीब योजनेसाठी अर्थसंकल्पात ४५ कोटी रुपयांची तरतूद होती, त्यापैकी ४४ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी खर्च झाला आहे. अंशदायी योजनेत ९० लाख रुपयांची तरतूद होती, या योजनेसाठी यापूर्वी दीड कोटीचे वर्गीकरणही केले होते, पण जानेवारी अखेरीस हा निधीही संपला आहेत, त्यामुळे आता पुन्हा नव्याने वर्गीकरण करावे लागले आहे.

Fund
कात्रज डेअरी निवडणुक; राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बुजूर्ग संचालक पुन्हा आखाड्यात उतरण्यासाठी इच्छुक

स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी अर्थसंकल्पात १४६ कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली होती. त्यातून अंशदायी योजनेअंतर्गत महापालिका कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी १५ कोटी रुपये, नगरसेवकांच्या आरोग्य सेवेसाठी १ कोटी रुपयांचे वर्गीकरण केले आहे. शहरी गरीब योजनेसाठी २६ कोटी रुपये उपलब्ध केले आहेत. शहरी गरीब योजनेअंतर्गत एक लाख रुपयांच्या पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना वैद्यकीय सेवा दिली जाते. तर अंशदायी वैद्यकीय सहायता योजनेतून महापालिकेचे सेवक आणि आजी-माजी नगरसेवकांच्या कुटुंबांना वैद्यकीय सेवा दिली जाते.’

पर्यावरणासाठी सल्लागाराची नियुक्ती

महापालिकेच्या पर्यावरण विभागातील विविध कामांसाठी सल्लागार नियुक्त करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. पर्यावरण विषयाशी महापालिकेकडून उपक्रम हाती घेतले जातात. हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषण, हरितीकरण, जैवविविधता, घनकचरा, आरोग्य, वाहतूक, ऊर्जा, कार्बन उत्सर्जन, हवामान बदल, शाश्वत विकास, पर्यावरणीय व्यवस्था, ग्रीन बिल्डिंग आदी क्षेत्र एकमेकांशी निगडित आहेत. १५ व्या वित्तीय आयोगांतर्गत प्राप्त निधीसाठी कृती आराखडा तयार करणे, विविध खात्यांशी समन्वय साधणे, प्रकल्पांचे प्रस्ताव तयार करणे यासाठी मे. केपीएमजी या सल्लागार संस्थेची दोन वर्षांसाठी नियुक्ती केली आहे. त्यांना १ कोटी १४ लाख रुपये शुल्क दिले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com