
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी नाव नोंदणी प्रमाणपत्र मिळालेल्या खासगी विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह अर्ज (आवेदनपत्रे) भरण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी नाव नोंदणी प्रमाणपत्र मिळालेल्या खासगी विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह अर्ज (आवेदनपत्रे) भरण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दहावी-बारावीची परीक्षा खासगीरीत्या देणाऱ्या विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्रे २५ जानेवारीपासून त्यांच्या भ्रमणध्वनीवर आणि ईमेलवर उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली आहे. या विद्यार्थ्यांना आपले स्वत:चे नावनोंदणी प्रमाणपत्र http://form17.mh-hsc.ac.in आणि http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध होत आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
या विद्यार्थ्यांना यापूर्वी नियमित शुल्काने १३ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याबाबत कळविले होते. मात्र, याला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता २०२१ मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी खासगीरीत्या नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह २८ फेब्रुवारीपर्यंत, तर विलंब शुल्कासह १ ते ७ मार्च दरमान्य अर्ज करता येणार आहे.
पुण्यात टोळीनं सामान्यांना लुटणारी गँग गजाआड; 'मोक्का'अंतर्गत कारवाई
नियमित व विलंब शुल्काच्या आवेदनपत्राची मूळ प्रत शुल्कासह त्वरित विभागीय मंडळाकडे सादर करण्यासाठी माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी विभागीय मंडळाकडे जमा करावीत, असेही राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे. तसेच याबाबत अधिक माहितीसाठी https://www.mahahsscboard.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.
Edited By - Prashant Patil