esakal | दिवाळीनिमित्त रेल्वेच्या जादा गाड्या
sakal

बोलून बातमी शोधा

Railway

दिवाळी आणि छठ पर्वासाठी पुण्यातून उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यामुळे पुणे ते गोरखपूर ही जादा गाडी, तसेच पुणे ते नागपूर ही विशेष गाडी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

दिवाळीनिमित्त रेल्वेच्या जादा गाड्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - दिवाळी आणि छठ पर्वासाठी पुण्यातून उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यामुळे पुणे ते गोरखपूर ही जादा गाडी, तसेच पुणे ते नागपूर ही विशेष गाडी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

पुणे-गोरखपूर-पुणे गाडी २१ ऑक्‍टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत धावणार आहे. ही गाडी पुणे येथून दर सोमवारी रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी सुटून बुधवारी ८ वाजून ३० मिनिटांनी गोरखपूर येथे पोचेल. गोरखपूर येथून दर बुधवारी सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी ही गाडी सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ९ वाजता पुणे स्थानकामध्ये पोचेल. नगर, बेलापूर, मनमाड, भुसावळ, झाशी, कानपूर या स्थानकांवर गाडीला थांबा देण्यात आला आहे.

पुणे-नागपूर ही विशेष गाडी १८ ऑक्‍टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत धावणार आहे. ही गाडी पुणे येथून दर शुक्रवारी रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी नागपूर येथे पोचेल, तर नागपूर येथून दर रविवारी दुपारी ४ वाजता गाडी सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी पुण्यात दाखल होईल. लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, अकोला, वडनेर, वर्धा या स्थानकांवर गाडीला थांबा देण्यात आला आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.

loading image