पुणे - सध्याच्या डिजिटल युगात सतत संगणकाच्या स्क्रीनकडे पाहिल्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात (आयटी) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये डोळ्यांचे विकार वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. पुण्यातील ‘एनआयओ’ रुग्णालयाने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून ‘आयटी’मधील ४६ टक्के तरुणांमध्ये डोळे कोरडे होण्याचा त्रास (ड्राय आय सिंड्रोम) लक्षणीयरीत्या वाढला असल्याचे समोर आले आहे.