esakal | परीक्षेस आत्मविश्‍वासाने सामोरे जा!
sakal

बोलून बातमी शोधा

mpsc

परीक्षेस आत्मविश्‍वासाने सामोरे जा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

स्वारगेट : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वर्ग दोन पदांकरिता संयुक्त पूर्वपरीक्षा शनिवारी (४ सप्टेंबर) होत आहे. यासाठी विद्यार्थी वर्षानुवर्षे अभ्यास करीत असतात. यामध्ये शेवटचे काही तास व त्यादिवशी कसा पेपर सोडवता हे महत्त्वाचे असते. यासंदर्भात ‘सकाळ’ने घेतलेला आढावा.

एका तासात आपण कशा पद्धतीने पेपर सोडवतो यावर आपला निकाल अवलंबून असतो. त्यासाठी वेळेचे नियोजन फार महत्त्वाचे आहे. यामध्ये एकूण सात घटकांवर प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक घटक महत्त्वाचा असतोच. पण सात घटकांपैकी जे विषय आपल्याला सोपे जातात ते लवकर सोडवून झाले पाहिजे. त्यानंतर जे विषय आपल्याला अवघड वाटतात अशा विषयांचे प्रश्न सोडवून घेणे फायद्याचे ठरेल. चालू घडामोडी, सामान्य ज्ञान आणि अंकगणित व बुद्धिमत्ता हे विषय गुण मिळवून देणारे आहेत. त्यामुळे त्यांना पुरेसा वेळ द्यावा. प्रश्न सोडवत असताना वेळेचे भानही ठेवणे आवश्यक आहे.

- संतोष कोळी, फौजदार (प्रशिक्षणार्थी)

हेही वाचा: चंद्रकांत पाटलाच्या नावाखाली जमीन बळकाविण्याचा प्रयत्न

परीक्षेच्या आदल्यादिवशी आपले परीक्षा केंद्र नेमके कुठे आहे याचा अंदाज घ्या. त्यासाठी गुगल मॅपचा वापर करू शकता. आदल्यारात्री पूर्ण झोप होणे गरजेचे असल्याने जागरण टाळावे. शक्यतो परीक्षा केंद्रावर निर्धारित वेळेपेक्षा एक तास आधी पोचा. अनावश्यक चर्चा टाळा. परीक्षेला लागणारे सर्व साहित्य जवळ आहे याची खात्री करा. वेळ असेल तर महत्त्वाचे मुद्दे, सनावळी एकदा पाहून घ्या. उत्तरपत्रिका तसेच प्रश्नपत्रिका मिळाल्यावर नीट तपासून पहा, त्यावर तुमचा बैठक क्रमांक, विषय संकेतांक आदी काळजीपूर्वक लिहा. उत्तर माहीत नसेल तर तो प्रश्न सोडवू नका. त्याने तुमचे नकारात्मक गुण कमी राहतील. उत्तरपत्रिके वर गोल करताना शांत चित्ताने गोल करावेत.

- मच्छिंद्र आंधळे, राज्य कर निरीक्षक (एसटीआय)

हे लक्षात ठेवा

  1. परीक्षा केंद्रावर योग्य वेळी पोचावे

  2. प्रश्न सोडवताना गोंधळून जाऊ नये

  3. सोपे प्रश्न पहिल्यांदा सोडवून घ्यावे

  4. गणित, बुद्धिमत्ता या घटकाला वेळ लागतो, त्यासाठी मुबलक वेळ ठेवावा

  5. मिळालेल्या एका तासात तुम्ही कसे प्रश्न सोडवता यावर तुमचे यश अवलंबून आहे

  6. आपण उत्तरपत्रिकेत केलेला गोल योग्य प्रश्नासाठीच केला आहे की नाही हे तपासून पहावे

  7. पेपर कितीही अवघड असेल तरी तो आत्मविश्वासाने सोडवावा

loading image
go to top