
फेसबुक वर ओळख झालेल्या विवाहित महिलेकडून गेम करण्याची धमकी, ब्लॅकमेलिंगचा प्रकार उघडकीस.
'तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून तुझा गेम करेल, तुला गाडीने उडवेल'
मंचर - फेसबुकवरुन ओळख झाल्यानंतर 'तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून तुझा गेम करेल, तुला गाडीने उडवेल' अशी धमकी मंगेश नारायण हुले (रा.नारोडी ता. आंबेगाव जिल्हा पुणे) यांना दिली. त्यांच्याकडून वेळोवेळी अडीच लाख रुपये घेतले . घरातील साहित्य चोरून नेले. या आरोपावरून मंचर पोलिसांनी रुपाली गोरख रासकर (रा. शिवसहारा सोसायटी, ता. पारनेर जि. अहमदनगर) या विवाहितेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मंचर पोलिसांनी याबाबत सांगितले की, रुपाली रासकर या महिलेची जानेवारी 2022 मध्ये मंगेश हुले यांच्या समवेत फेसबुकद्वारे ओळख झाली होती. त्यानंतर मोबाईलद्वारे सतत संपर्कात झाला. हुले यांनी रुपालीला तिच्या कुटुंबाबाबत विचारले असता तिने तिचे लग्न झाले असून पतीशी घटस्फोट घेतला आहे. ती एकटीच माहेरी बाबूर्डी (ता. पारनेर) येथे राहत असल्याचे सांगितले. त्यानंतर मार्च 2022 पासून मंचर (ता. आंबेगाव) येथे दोघेजण एकत्र राहू लागले.
रुपालीने मंगेश हुले यांचा विश्वास संपादन करुन 'गावी मला वडिलोपार्जित जमिनीत हिस्सा मिळणार आहे. त्यासाठी मी कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे. मला आर्थिक मदत करा. मी दावा जिंकल्यानंतर मिळालेले पैसे तुम्हाला देईल.' असे सांगितले. रूपाली ने हुले कडुन वेळोवेळी अडीच लाख रुपये घेतले. हुले यांना घरात रुपालीचे रेशन कार्ड मिळाले. तीला दोन मुले असल्याचे समजले. 'तू माझ्याशी खोटे का बोललीस मी दिलेले पैसे परत दे' असे हुले म्हणाले. रुपालीने ‘मला मुले असल्याबाबतची गोष्ट कोणालाही सांगू नको. नाहीतर तुला मारुन तुझा गेम करुन टाकीन.’ अशी धमकी दिली. त्यानंतर हुले यांनी रुपाली बाबत चौकशी केली असता मोराची चिंचोली (ता. शिरुर) येथील व्यक्तीबरोबर रूपालीचे लग्न झाल्यानंतर तिने त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. रुपालीवर पारनेर येथे संतोष गंधारे याला गाडीने उडवल्या बाबत जीवे मारण्याचा गुन्हा दाखल आहे.
मंचर येथे राहत असताना हुले कामानिमित्त बाहेर गेला असता रुपालीने घरातील एल.ई.डी टीव्ही, दोन मोबाईल व इतर साहित्य चोरी करुन नेले असल्याचे घुले यांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी मंचर मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक किरण भालेकर करत आहे.