असं आहे राज्यात प्रथम आलेलं पुण्यातलं डॉ. दळवी रुग्णालय

समाधान काटे
बुधवार, 22 जानेवारी 2020

शासकीय रुग्णालय म्हटलं की नेहमीच सुविधांचा अभाव असं चित्र डोळ्यासमोर उभे राहते मात्र त्याला फाटा देत शिवाजीनगर येथील डॉ. दळवी रुग्णालयाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत असलेल्य 'कायाकल्प' या घटकात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.

पुणे : शासकीय रुग्णालय म्हटलं की नेहमीच सुविधांचा अभाव असं चित्र डोळ्यासमोर उभे राहते मात्र त्याला फाटा देत शिवाजीनगर येथील डॉ. दळवी रुग्णालयाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत असलेल्य 'कायाकल्प' या घटकात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. तसेच पुणे महापालिका देखील राज्यात आरोग्य विभागात प्रथम आली. रुग्णांना दिली जाणारी गुणवत्तापूर्ण सेवा, रुग्णालयाची स्वच्छता, जंतूसंसर्ग असा थांबवता येईल? बांधकाम, वातावरण, कागदपत्रे,रुग्णांशी डॉक्टरांचा संवाद कसा आहे? मेडीकलच्या कचऱ्याची कशी विल्हेवाट लावली जाते?या व इतर बाबींचा विचार करून महापालिका व राज्यस्तरीय परिक्षण समितीने राज्यस्तरीय पाहणी केली होती. यानंतर राज्यात प्रथम क्रमांकावर डॉ दळवी रुग्णालयाची निवड करण्यात आली.

रुग्णालयचा परिचय
१९५० रोजी शिवाजीनगर भागात पुणे महापालिकेचे पहिलं बसके रुग्णालय सुरू झाले.सरकारी रुग्णालयात असल्यामुळे मोफत उपचार मिळत.उपचारासाठी शिवाजीनगर परिसरासह पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून रुग्ण डॉ दळवी रुग्णालयाकडे येऊ लागले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

२०१८ साली 'कायाकल्प' हा प्रकल्प राबविण्यासाठी पुणे महापालिकेने पुढाकार घेऊन सर्व रुग्णालयांना माहिती दिली.त्यामध्ये डॉ दळवी रुग्णालयात हे एक होते. डॉ दळवी रुग्णालयाच्या प्रमुख स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.माधुरी पवार सांगतात.

" सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ.मनिषा नाईक व राज्यस्तरीय प्रतिनिधी गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉ.प्रधान यांनी रुग्णालयास भेट देऊन 'कायाकल्प' या घटकाविषयी आम्हला माहिती दिली.त्यानंतर आम्ही रुग्णालयात असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी वेगवेगळे गट स्थापन केले.प्रत्येक गटाने एक एक जबाबदारी घेतली.त्याप्रमाणे गटाने काम सुरू केलं.दर महिन्याला मिटिंग घेऊन समस्याचे निराकरण केले.एक एक समस्या सुटत गेली.सवयीचा परिणाम सर्वांच्या अंगवळणी पडला.गटाने काम केल्याने उत्साह वाढत गेला.वरिष्ठांनी वेळोवळी मार्गदर्शन करुन प्रोत्साहित केले.रुग्णालयात भरपूर बदल केले यामध्ये बाहेरची स्वच्छता, आतील पडदे, वीज, पंखे, फर्निचर, बांधकाम, अतिक्रमण, ड्रेसकोड, स्वच्छतेबाबत मार्गदर्शन, मेडिकल स्टोअर पध्दतशीर लावून घेतले. रुग्णांशी कसं बोलायचं हे शिकवलं गेलं. संपूर्ण रुग्णालयात जागोजागी योग्य त्या सुचनांचे फलक लावले, प्रायोगिक तत्त्वावर चालवण्यासाठी दिलेली लॅब त्या ठिकाणी  देखील सुचना फलक लावून,टापटीपणे साहित्य ठेवले.रुग्णालयाची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले असता रुग्णांचा देखील चांगला प्रतिसाद मिळाला.राज्यात प्रथम क्रमांकाचे १५ लाख रुपये बक्षीस मिळाले याच अभिमान वाटतो.पुणे मनपाचा राज्यात मान वाढला.बक्षिस मिळाले हे माहित होताच इतरही रुग्णालयांनी बदल करायला सुरुवात केली आहे"

ऑपरेशन थिएटर, डिलिव्हरी रुम,स्पेशल रुम,आय.पी.डी नर्सिंग स्टेशन,२ वाॅर्डमध्ये ५ आधिक ५ असे एकूण १० बेड, डाॅक्टर २ स्त्रीरोगतज्ज्ञ,१ एम बी बी एस,१ बालरोगतज्ज्ञ,२४ तास सुरक्षा रक्षक,तापासणी विभाग,आस सी टी एस.एच आय व्ही विभाग, केस पेपर, सोनोग्राफी, क्षयरोग विभाग, मेडिकल फार्मसी, कुत्रे चावल्याचे लसीकरण विभाग, कुटुंब नियोजन विभाग,रुग्णवाहिका शासकीय १०८ नंबर एक, खाजगी २ ,आया,मेहतर,मेहतराणी एकूण ९ कर्मचारी.

"दिवसभरात सकळी, दुपारी, आणि संध्याकाळी अशी तीन वेळा स्वच्छता केली जाते.मागील ३० वर्षांपासून स्वच्छतेचे काम करत आहे.सर्वांनी मिळून एकत्र येऊन काम केल्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळाला याचा आनंद वाटतो".
- मिना शेळकंदे, मावशी 

"माझी प्रसृती याच रुग्णालयात झाली. आज माझ्या सुनेला देखील इथेच घेऊन आले आहे. डॉक्टर रुग्णांना चांगली वागणूक देतात.स्वच्छता ठेवतात.मोफत असल्याने पैसे वाचतात.म्हणून आम्ही या रुग्णालयात येतो".
- बानू नय्यम शेख, पेशंट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: facilities in Dr Dalvi hospital pune