esakal | कोरोनासह मूत्रपिंडाच्या रुग्णांवरही उपचार; जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये सुविधा
sakal

बोलून बातमी शोधा

pmc

कोरोनासह इतर म्हणजे, मधुमेह, अस्थमा, मूत्रपिंड, हृदयरोगासारखे आजार असलेल्या रुग्णांची प्रकृती उपचारादरम्यान बिघडते. त्यामुळे मृत्यूदरही वाढत असल्याचे वैद्यकीय अहवालांनुसार सिद्ध झाले आहे.

कोरोनासह मूत्रपिंडाच्या रुग्णांवरही उपचार; जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये सुविधा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोना रुग्णांसाठी उभारलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनासह मूत्रपिंडाच्या रुग्णांनाही उपचार मिळणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र डायलिसिस विभागही सुरू करण्यात आला आहे. एकावेळी 16 रुग्णांचे असे दिवसाला किमान 40 मूत्रपिंडाच्या रुग्णांना (गरजेनुसार) उपचार मिळणार आहेत, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

कोरोना रुग्णांना "आयसीयू' आणि ऑक्‍सिजन बेड उपलब्ध करून देण्यासाठी पुण्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) आवारात जम्बो कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. त्यात सहाशे ऑक्‍सिजन आणि दोनशे "आयसीयू' बेडची व्यवस्था आहे. या सुविधा कोरोना रुग्णांना असल्या तरी अन्य उपचारांचीही गरज भासणार असल्याने पहिल्या टप्प्यात मूत्रपिंडाच्या रुग्णांसाठी "डायलिसिस' सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनासह इतर म्हणजे, मधुमेह, अस्थमा, मूत्रपिंड, हृदयरोगासारखे आजार असलेल्या रुग्णांची प्रकृती उपचारादरम्यान बिघडते. त्यामुळे मृत्यूदरही वाढत असल्याचे वैद्यकीय अहवालांनुसार सिद्ध झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाच्या रुग्णांना वेळेत आणि नेमके उपचार देऊन मृत्यूदर कमी करण्याचा यंत्रणांचा प्रयत्न आहे, असे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी स्पष्ट केले. 

अन्य आजारांचेही निदान होणार 
या सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांवर आवश्‍यकतेनुसार अन्य आजारांचे निदान आणि उपचार केले जाणार आहे. त्यातून "डायलिसिस'ची व्यवस्था असून, तिची व्याप्ती वाढवून एका वेळी 32 जणांना डायलिसिस करता येईल का? यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले. त्यावर कार्यवाही करत ही सुविधा विस्तारण्याची तयारी महापालिका आणि संबंधित यंत्रणांनी केली आहे. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आजपासून रुग्ण दाखल होतील 
शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारातील जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये मंगळवारपासून (ता. 25) रुग्ण दाखल करून घेतले जाणार आहेत. त्यासाठीची पूर्वतयारी झाली आहे. तांत्रिक तपासण्यांसह संपूर्ण 13 हजार चौरस फुटांच्या या सेंटरचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे, असे डॉ. हंकारे यांनी सांगितले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image
go to top