आदित्य ठाकरेंचे नाव आम्ही घेतलेले नाही - देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 29 August 2020

देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात संशय व्यक्त केला. या घटनेत युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव भाजपच्या एकाही नेत्याने कधी घेतले नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

पुणे - अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणाची "सीबीआय'कडून चौकशी सुरू होताच नवनवे खुलासे पुढे येत आहेत. ते आधी का आले नाहीत? अशी विचारणा करत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात संशय व्यक्त केला. या घटनेत युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव भाजपच्या एकाही नेत्याने कधी घेतले नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

महापालिकेच्या वतीने बाणेरमध्ये उभारलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्‌घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. बऱ्याच कालावधीनंतर दोघे नेते एकाच व्यासपीठावर होते. फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोरोनाच्या साथीत काय करायले हवे, राज्य सरकारचे नेमके कुठे चुकते, उपायांवर भर कसा द्यावा, हेही फडणवीस यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

फडणवीस म्हणाले, "सुशांतसिंहच्या मृत्यूच्या चौकशीसाठी "सीबीआय'चा आग्रह होता; मात्र ती नेमण्याआधी आणि आता चौकशी सुरू झाल्यानंतरच्या खुलाशांमध्ये तफावत आहे. यासंदर्भात एकवाक्‍यता दिसली नाही. या चौकशीतून सगळे पुढे येईल. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुण्यासह राज्यातील तपासण्या वाढविल्या पाहिजेत.' 

विद्यार्थ्यांच्या भवितव्याकडे राज्याचे दुर्लक्ष 
युवासेनेची भूमिका आणि त्यांच्या हट्टापायीच राज्यात परीक्षा न घेण्याबाबत राज्य सरकार आग्रही राहिले होते; मात्र त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती होती. मात्र त्याचा विचार सरकारने केला नाही. परीक्षा घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय योग्य आणि स्पष्ट आहे. त्यामुळे सरकारला परीक्षा घ्यावी लागणार आहे. उशिराने का होईना पण आता परीक्षा होतील, असेही फडणवीस यांनी सांगितले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

माझा आवाज कोणीच दाबू शकत नाही 
कोविड केअर सेंटरच्या उद्‌घाटनानंतर उपमुख्यमंत्री पवार, विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यासह इतर मान्यवर शुभेच्छा व्यासपीठावर आले. तेव्हा पहिल्यांदा फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या; परंतु माइकमधून त्यांचा आवाज पुरेसा स्पष्ट येत नसल्याचे उपस्थितांनी सांगितले. त्यावर लगेचच मिश्‍किलपणे फडणवीस म्हणाले, "हो का?, तसा माझा आवाज कोणीच दाबू शकत नाही.' त्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. विशेष म्हणजे, अजित पवार हे फडणवीस यांच्या शेजारीच होते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fadnavis clarified that Aditya Thackeray name was never mentioned by any BJP leader