
तळेगाव : प्राथमिक आरोग्य सेवांवर जास्त भर दिला तर त्रितियक आरोग्य सेवेवर ताण कमी पडतो.त्यासाठी प्राथमिक आणि त्यानंतर द्वितीयक आरोग्य सेवांवर लक्ष केंद्रित करण्याहेतूने राज्यात आरोग्य सेवेचे मोठे जाळे तयार करत आहोत.सरकारी आणि खाजगी रुग्णालये,वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून निश्चितच त्रितियक आरोग्य सेवेची व्यवस्था करता येईल.याकरिता राज्याच्या आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.