
Pune Crime
Sakal
पुणे : रात्रीच्या अंधारात अपघाताचा बनाव रचून तरुणाला मारहाण करून दोन मोबाईल लुटणाऱ्या टोळीला सहकारनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून २५ हजार रुपयांचे मोबाईल जप्त केले आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.