नारायणगाव - सहा ते सात अविवाहित तरुणांशी लग्न करून लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करून पसार झालेल्या आठ जणांच्या टोळीतील बनावट नवरीसह सात जणांना नारायणगाव पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक करून जेरबंद केले आहे. अटक आरोपी पैकी चार जणांना न्यायालयीन कोठडी तर तीन जणांना पोलीस कोठडी मिळाली आहे.