
Cough Syrup Alert
Sakal
पुणे : मध्य प्रदेशमध्ये ज्या भेसळयुक्त ‘कोल्ड्रिफ’ कफ सिरपचे सेवन केल्यामुळे बालकांचा मृत्यू झाला त्या कफ सिरपचे वितरण पुण्यात झालेले नाही. त्यामुळे, नागरिकांनी याबाबत काळजी करण्याचे कारण नसून इतर सिरपच्या कंपन्यांचे नमुने खबरदारी म्हणून घेण्यात येत आहेत, अशी माहिती पुणे विभागाच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए, औषध विभाग) दिली.