Fake Currency Racket Busted
sakal
पुणे - शहरात बनावट नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या आंतरजिल्हा टोळीतील चौघांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. आरोपींच्या ताब्यातून पाचशे रुपये दराच्या पाच लाख ६४ हजार रुपयांच्या बनावट नोटा, प्रिंटर आणि संगणकीय साहित्य जप्त केले आहे. या रॅकेटचे सातारा, कोल्हापूर व मुंबई कनेक्शन असल्याचे तपासात समोर आले आहे.