
पुणे - बनावट नोटांच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. शिवाजीनगर पोलिसांनी जप्त केलेल्या बनावट नोटांचा पुरवठा परराज्यातील टोळीने संपूर्ण देशात केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आता संबंधित टोळीच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोचण्यासाठी पुणे पोलिसांची पथके परराज्यात रवाना झाली आहेत.