Cyber fraud in Pune
पुणे : याप्रकरणी ७६ वर्षीय ज्येष्ठ महिलेने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ सप्टेंबर रोजी महिलेच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला. समोरच्या व्यक्तीने स्वतःला केंद्रीय तपास यंत्रणेचा अधिकारी असल्याचे भासवले. ‘तुमच्या खात्यातून मनी लाँड्रिंगद्वारे आर्थिक व्यवहार झाला आहे. या प्रकरणी तुमच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते,’ अशी धमकी सायबर चोरट्यांनी महिलेला दिली. त्यानंतर प्रकरण मिटविण्यासाठी चोरट्यांनी बॅंक खात्यात रक्कम भरण्यास सांगितले. दोन महिन्यांच्या कालावधीत महिलेने ७४ लाख रुपये आरोपींच्या खात्यात हस्तांतरित केले. शेवटी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांत धाव घेतली.