Pune Fraud News : हेलो, मी प्रिन्सिका जोशी बोलतेय....; मुलीच्या नावाने ‘स्नॅपचॅट’वर मैत्री अन्‌ दीड लाखाच्‍या 'क्रिप्टोकरन्सी'ला गंडा

महिलेच्‍या मधाळ आवाजात ‘स्‍नॅपचॅट’ या समाजमाध्‍यम ॲपवरून बोलणारी ती महिला. तब्बल सात महिने ‘ती’ने एका पुरुषासोबत संवाद सुरू ठेवला. अन्‌....
Online Fraud
Online Fraudsakal
Updated on

पुणे - ‘हेलो, मी प्रिन्सिका जोशी. क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा मिळेल’ असे महिलेच्‍या मधाळ आवाजात ‘स्‍नॅपचॅट’ या समाजमाध्‍यम ॲपवरून बोलणारी ती महिला. तब्बल सात महिने ‘ती’ने एका पुरुषासोबत संवाद सुरू ठेवला. अन्‌ तिच्‍या लाघवी बोलण्‍याला भुलून ‘त्‍या’ने महिलेच्‍या अकाउंटवर तब्‍बल दीड लाख रुपयांचे आभासी ‘क्रिप्टोकरन्सी’ वळते केले. जसा हा व्‍यवहार झाला तसे प्रिन्सिका जोशी हे अकाउंटही बंद पडले. तपासानंतर आढळले की ती ‘प्रिन्सिका’ या महिलेचा नसून मुलीच्या आवाजात संवाद साधणारा होता पुरुष.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com